टाकळीमियात उद्यापासून वाजणार शाळेची घंटा

टाकळीमियात उद्यापासून वाजणार शाळेची घंटा

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी (Rahuri) तालुक्यातील टाकळीमिया (Takalimiya) येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज ही शाळा सुमारे एक वर्षाच्या कालखंडानंतर शिक्षक, शाळा व्यवस्थापन कमेटी व पालकांच्या समन्वयाने सोमवार दि. 19 जुलैपासून सुरू होत असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य डी. आर. म्हसे यांनी दिली.

शाळा व्यवस्थापन कमेटी व पालक यांची शाळा सुरू करण्यासंबंधी बैठक (School start Meeting) आयोजित करण्यात आली. यावेळी शाळेचे प्रा. सुभाष शिंदे यांनी सांगितले, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने राज्यातील मुलांच्या पालकांशी संपर्क साधून शाळा सुरू करण्यासंबधात सर्वे करण्यात आला. त्यातील सुमारे 85 टक्के पालकांनी शाळा सुरू व्हाव्यात, असे मत मांडले. त्यामुळे कोविड रोगाचा प्रादुर्भाव ज्या भागात कमी किंवा अजिबात नाही, अशा ठिकाणी शाळा सुरू होतील, असे परिपत्रक शिक्षण खात्याने जारी केले. या परिपत्रकात शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन कमेटी व पालकांची संमती असेल तरच व कोविडचे सर्व नियमाचे पालन शाळा सुरू करण्यात येईल, असे सांगितले आहे.

त्यानुसार शाळेत संपूर्ण सॅनिटायझरींग, वर्गव्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, दररोज तापमापन करून काळजी घेणार आहोत. त्याचप्रमाणे प्रत्येक पालकाने संमतीपत्र भरून दिल्यानंतरच त्यांच्या पाल्यास शाळेत प्रवेश दिला जाणार आहे, असे सांगून सध्या 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू करण्यात येतील. त्यानंतर शासनाकडून 5 ते 7 वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय आल्यानंतर तेही वर्ग सुरू होतील. मात्र, तोपर्यंत ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य केंद्राच्या पर्यवेक्षिका शिंदे, बाळासाहेब जाधव, अशोक चौधरी यांनी मार्गदर्शन केले. चर्चेनंतर पालकांनी संमती दर्शविली. त्यामुळे आता सोमवारपासून शाळा सुरू करण्यात येईल असे प्राचार्य म्हसे यांनी जाहीर केले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश करपे, डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व मियासाहेब पतसंस्थेचे अध्यक्ष शामराव निमसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, उपसरपंच सुभाष जुंदरे, माजी सरपंच ज्ञानदेव निमसे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पर्यवेक्षिका शिंदे, बाळासाहेब जाधव, पो.पाटील नामदेव जगधने, रावसाहेब कवाणे, अशोक चौधरी, अरविंद चोथे, अनिल करपे, दत्तात्रय जुंदरे, वने, प्रफुल्ल सगळगिळे, नितीन जाधव, अशोक वाघ, प्रदीप कड, विष्णू मुळे, राजेंद्र करपे, कारभारी फाटक, गुलाब निमसे, सुरेश सूर्यवंशी, सतीश चोथे , शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. सुभाष शिंदे यांनी तर आभार धामोरे यांनी मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com