
टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya
राहुरी (Rahuri) तालुक्यात टाकळीमिया सह (Takalimiya) अनेक भागात कांद्याचे रोप (Onion Crops) शिल्लक आहे फुकट घेऊन जा.. अशी परिस्थीती दिसत आहे. सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकर्यांच्या कांदा लागवडी (Onion Planting) पूर्ण झाल्या आहेत तर बाकीची कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली असुनही कांदा लागवडीची (Onion Planting) लगबग सुरुच आहे अनेक शेतकर्यांकडे रोपे शिल्लक राहीले आहेत, आता या रोपांचे करायचे काय?असा प्रश्न पडल्याने रोप फुकट देऊन आपले रान मोकळे करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.
मागील काही वर्षाचा अनुभव पहाता ऐनवेळी रोप कमी पडत असून ऐनवेळी रोप (Crops) मिळत नाही यासाठी शेतकर्यांनी जास्तीचे रोप टाकले. आता मात्र, अनेक शेतकर्यांच्या कांदा लागवडी (Onion Planting) संपल्या असून उशीरा रान मोकळे झाल्याने व विजेचा लपंडाव सुरु असल्याने व मजुर उपलब्ध होत नाहीत. म्हणून उशीर झाल्याने आता कांदा लागवडीची (Onion Planting) लगबग सुरु आहे. विजे उपलब्धता व मजुर ऐनवेळी मिळत नाहीत म्हणून अनेक शेतकर्यांनी वाफा कांदा लागवड (Onion Planting) कोरड्यात करुन घेतली व विज आल्यानंतर त्यास पाणी दिले आहे.
ज्या शेतकर्यांकडे जास्तीची रोपे राहीली, त्यांना रोपाचे रान मोकळे करुन अन्य पिकांची लागवड करण्याची घाई झाली आहे. तर काही शेतकर्यांनी कोणी फुकटही रोप नेत नाही म्हणून शिल्लक रोपावर नांगर फिरवला. मात्र, काही शेतकर्यांना वाटते की, महागडे बियाणे व महागडी औषधे वापरुन ही रोपे जगवली आहेत पण आपल्या शेतातील रोप आपलेच शेतकरी बांधवाना मिळावे, अशी शुद्ध भावना बाळगुन कांद्याचे रोप (Onion Crops) मिळेल फुकट घेऊन जा! असे संदेश सध्या सोशल मिडीवर फिरत आहेत.