टाकळीमियात ऊस पिकावर हूमणी अळीचा प्रादूर्भाव

90 हेक्टर क्षेत्र बाधित
टाकळीमियात ऊस पिकावर हूमणी अळीचा प्रादूर्भाव

टाकळीमिया |वार्ताहर|Takalimiya

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) टाकळीमिया (Takalimiya) परिसरात ऊस पिकावर (Sugar Cane Crops) हुमणी अळीचा (Humani Larvae) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन सुमारे 80 ते 90 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Farmers Loss) झाले असून शासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी (Demand) शेतकर्‍यांनी केली आहे.

सलग 4 वर्षापासून या हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने ऊस पिकाचे नुकसान (Loss to sugarcane crop) होत आहे. याबाबत कृषी सहाय्यक शिवप्रसाद कोहकडे म्हणाले, या अळीचा प्रादुर्भाव खोडवा ऊस पिकावर (Khodwa sugarcane Crops) व हलक्या व पाण्याचा लवकर निचरा होणार्‍या जमिनीत जास्त प्रमाणात फैलाव होतो. हुमणी अळी (Humani Larvae) सुरवातीच्या लहान अवस्थेत असताना तिला खाण्यास पोषक वातावरण तयार होऊन तिची जमिनीत वाढ होते. तशी ती उसाच्या मुळ्या कुरतडून खाते. त्यामुळे उसाची पाने पिवळी पडू लागतात व नंतर सुकू लागतात. नंतर उसाचे बेटच कोलमडते. अशाप्रकारे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अळीची (Larvae) पूर्ण वाढ झाल्याने या काळात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव जाणवतो. आम्ही सुरवातीपासूनच कृषी खात्यामार्फत या अळीच्या बंदोबस्तासाठी वेळोवेळी सूचना देऊन लाईट ट्रॅप, जैविक औषध फवारणी, इतर किटक नाशके वापरण्याचे तसेच शेतात पिकांचा फेरपालट करण्याचा आदी प्रकारचे मार्गदर्शन करून काही प्रात्यक्षिक करून दाखविले आहे. असेही कोहकडे यांनी सांगितले. मात्र, सध्यातरी या हुमणी (Humani) रोगाने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. शासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.