टाकळीमियाच्या उपकेंद्रातून वीज ग्राहकांना ‘झटका’

टाकळीमियाच्या उपकेंद्रातून वीज ग्राहकांना ‘झटका’

अनियमीत वीजपुरवठ्यामुळे ग्राहकांची आंदोलनाची तंबी

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी (Rahuri) तालुक्यातील टाकळीमिया (Takalimiya) येथील महावितरणच्या वीज उपकेंद्रातून (MSEDCL power substation) होत असलेला वीजपुरवठा वारंवार खंडित (Frequent power outages) होत असल्याने या भागातील शेतकरी व वीजग्राहक ग्रामस्थ वैतागले आहेत. वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा (Movement Hint) या भागातील वीजग्राहकांनी दिला आहे.

या वीज उपकेंद्रातून टाकळीमिया गावठाण, टाकळीमिया, मोरवाडी, लाख, जातप, त्रिंबकपूर या गावासह शेतीसाठी विजवितरण केले जाते. मात्र शेतीसाठी ठरवून दिलेल्या 8 तासापैकी दररोज 7 ते 8 वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेती पंपासाठी (Agricultural pump) फक्त 6 तास वीज मिळते तीच अवस्था गावासाठी असलेल्या विजपुरवठ्याची आहे. गावात अनेक पिठाच्या गिरण्या व इतर लघुउद्योग विजेवर अवलंबून आहेत. एकीकडे लॉकडाऊनमुळे व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. आता लॉकडाऊन (Lockdown) थोडा शिथील केल्याने व्यवसायासाठी काही तास मिळतात व त्यातही वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्याने उद्योग बंद पडतात. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते.

वीज वितरणासाठी सर्वत्र बसविण्यात आलेल्या रोहित्रांची अत्यंत दयनीय अवस्था असून लोंबकळलेल्या व जळालेल्या केबल, फुटलेल्या फ्युजा, यामुळे रोहित्र जळतात. शेतीसाठीचे रोहित्र जळाले किंवा केबल व फ्युजा खराब झाल्यावर महावितरणकडे सामान शिल्लक नाही. तुम्हीच आणून द्या, असे सांगितले जाते. शेतकरीही पिकांचे नुकसान होऊ नये, या हेतुने वर्गणी करून सामान किंवा रोहित्रही वर्गणी करून दुरूस्त करून आणतात. गावातील व वाड्यावस्तीवर होणारा सिंगलफेज वीजपुरवठा वारंवार खंडीत केला जातो. तरी या उपकेंद्रातून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी या भागातील शेतकरी वर्ग तसेच वीजग्राहकांनी केली असून आंदोलन करण्याची वेळ आणू नका, असा निर्वाणीचा इशारा वीज वितरणाच्या अधिकार्‍यांना दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com