टाकळीमियात डंपरखाली सापडून तरुण जागीच ठार

टाकळीमियात डंपरखाली सापडून तरुण जागीच ठार

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी (rahuri) तालुक्यातील टाकळीमिया (Takalimiya) येथे डंपरखाली सापडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (Youth death) झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी पाच वाजता गावात घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार परितोष रामचंद्र कुलकर्णी (वय 38) (Paritosh Ramchandra Kulkarni) असे अपघात झालेल्या तरुणाचे नाव असून तो येथील रामचंद्र भगवान कुलकर्णी यांचा धाकटा मुलगा आहे. रामचंद्र कुलकर्णी यांच्या जुन्या जागेतून डंपरने माती वाहतूक दिवसभर सुरू होती. परितोष हा गावातून येतो, असे घरी सांगून पायी चालत निघाला असता थोडे अंतर चालून गेल्यावर त्याच्या पाठीमागून सुमारे पाचशे फूट अंतरावरून माती भरलेला डंपर (Dumper filled with soil) येत होता.

मात्र या डंपरच्या मागील टायरखाली परितोष सापडल्याने तो जागीच ठार (Death) झाला. पारितोष याने पुणे येथे उच्चशिक्षण घेऊन इंजिनिअर (Engineer with higher education at Pune) होऊन त्याने अमेरिकेत नोकरी (Jobs in the US) केली होती. त्यानंतर तेथून आल्यानंतर आता तो पुणे येथे वरिष्ठ पदावर नोकरी करत होता. तो नुकताच पाच-सहा दिवसापूर्वी सुट्टीसाठी आपल्या घरी आला होता. त्याने लेकरू (Lekaru) या मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले (Worked as a child actor in Marathi films)असून त्याची भूमिका चांगलीच गाजली होती. काल विकेंड लॉकडाऊन असतानाही अपघातस्थळी मोठी गर्दी जमली होती. यावेळी नागरिकांत अपघाताबाबत वेगवेगळे तर्क लावले जात होते. तर गावात नुकतेच रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले असून साईटपट्टी भरल्या नाहीत, अशी तक्रार काही नागरिकांनी केली.

घटनेची माहिती पोलीस पाटील नामदेव जगधने यांनी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ येऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरी येथे पाठविण्यात आला. देवळाली पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्सटेबल प्रभाकर शिरसाठ व पोलीस गणेश फाटक हे पुढील तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com