
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तुझ्यामुळे माझा मुलगा घर सोडून गेला, तूपण घर सोडून जा, असे म्हणत टाकळीभान येथे महिलेस मारहाण करण्यात आली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील वर्षा नितीन त्रिभूवन (वय 32) ही दि. 21 फेब्रुवारी रोजी अंगणात झाडलोट करीत असताना सासरे बापूराव तेथे आले व म्हणाले, तुझ्या जाचास कंटाळून माझा मुलगा दोन वर्षांपासून निघून गेलेला आहे.
तू पण हे घर सोडून तुझ्या आई-वडिलांकडे निघून जा, असे म्हणत त्यांनी मला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर मी आरडाओरडा केल्यानंतर माझा भाया, जाव व सासू यांनी मला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मला विषारी औषध पाजून संपवून टाका, असे म्हणत धमकावले.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात वर्षा नितीन त्रिभूवन यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी बापूराव खंडेराव त्रिभूवन, कमल बापूराव त्रिभूवन, सुनिल बापूराव त्रिभूवन आणि मिना सुनील त्रिभूवन यांच्याविरोधात भादंवि कलम 323, 324, 34, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.