टाकळीभान गावाला विकास निधी कमी पडू देणार नाही : आ. कानडे

टाकळीभान गावाला विकास निधी कमी पडू देणार नाही : आ. कानडे

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील टाकळीभान (Takalibhan) हे गाव लोकसंख्येने मोठे आहे. त्यामुळे झपाट्याने वाढत असल्याने सुविधा अपुर्‍या पडत आहे. कार्यकर्त्यांनी विकास आराखडा तयार करावा. विकास कामासाठी निधी (Fund) कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ. लहु कानडे (MLA Lahu Kanade) यांनी येथील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळास (Delegation) दिली.

गेल्या पाच वर्षात विकास निधी (Fund) नसल्याने गावाचा विकास रखडल्याने प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने (delegation of Congress workers) आ. कानडे (MLA Lahu kanade) यांची भेट घेवून विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे (Demand) निवेदन दिले. शिष्टमंडळात (delegation) कार्लस साठे, ज्ञानेश्वर मुरकुटे, विष्णुपंत खंडागळे, भारत भवार, राजेंद्र कोकणे, विलास दाभाडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

येथील टाकळीभान (Takalibhan) ते बेलपिंपळगाव (BelPimpalgav), टाकळीभान-कारेगाव (Taklibhan-Karegav), टाकळीभान-मुठेवाडगाव (Taklibhan-Muthevadgav) हे दळणवळणाचे रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण तर टाकळीभानच्या (Takalibhan) कमानीपासून घोगरगाव रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरण तर तिर्थक्षेत्र विकासात महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, बुध्दविहार, संत सावता महाराज मंदिर, श्री साईबाबा मंदिर यांचा विकास. आदीवासी स्मशानभुमीसाठी जागा, कब्रस्थानमधील प्रार्थना स्थळाचा विकास, अतिरिक्त भारनियमनासाठी वाढीव रोहीत्र, गणेशखिंड वीज उपकेंद्राची क्षमता वाढवणे, टाकळीभानच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 24 तास वीज पुरवठा, भंडारदरा कालव्याच्या वितरिका क्रमांक 15 व 16 ची दुरुस्ती व वहन क्षमता वाढवणे तसेच तरुणांसाठी अद्ययावत व्यायामाचे साहित्य आदी मागण्याची जंत्रीच निवेदनाद्वारे आ. कानडे (MLA Lahu Kanade) यांना दिली.

आ. कानडे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत विकासासाठी टाकळीभान गाव दत्तक घेत असल्याचे सांगून गावच्या सर्वांगिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत व्यायाम शाळेसाठी 5 लाखाचे साहित्य उपलब्ध करुन दिले. तसेच पाणीपुरवठ्यासाठी 24 तास वीज उपलब्ध करुन देण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. वाढीव रोहित्रांसंबधीही महावितरणच्या अधिकार्‍यांशी तातडीने चर्चा करुन काम मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी दिले. आ. कानडे यांनी सर्व विकास कामांच्या मागणीची दखल घेतल्याने कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केलेे.

यावेळी प्रा. विजय बोर्डे, महेंद्र संत, मोहन रणनवरे, बाबासाहेब बनकर, गोरक दाभाडे, रामकृष्ण गायकवाड, तुकाराम बोडखे, गणेश गायकवाड, लाजरस रणनवरे, सुनिल रणनवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com