टाकळीभान परीसरात रिमझिम पावसाने खरीप पिकांना जिवदान

टाकळीभान परीसरात रिमझिम पावसाने खरीप पिकांना जिवदान

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

खरीप पिकांच्या पेरणीनंतर (Sowing of kharif crops) पावसाने ओढ दिल्याने पावसाअभावी खरीपाची पिके (Kharif Crops) हातची जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु गेल्या चार दिवसापासून परीसरात सुरु असलेल्या रिमझिम पावसाने (Rain) खरीप पिकांना जिवदान मिळाल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून येत आहे.

मृग नक्षत्रात होणार्‍या खरीप पिकाच्या (Kharif Crops) पेरण्या पावसाअभावी आधीच खोळंबल्या होत्या. उशिरा पेरणीयोग्य झालेल्या पावसाने महिनाभर पेरणी (Sowing) लांबली होती. सोयाबीन बियाणाचा तुटवडा (Shortage of soybean seeds) जाणवल्याने शेतकर्‍यांनी अव्वाच्या सव्वा भावाने बियाणे खरेदी करुन पेरणी केली आहे. बियाणे महागडे असले तरी सोयाबीन (soybean) पेरणीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबर महिन्यापासुन सोयाबीनच्या वाढलेल्या दराचा फायदा होईल, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे.

मात्र खरीप हंगामी सोयाबीन (soybean), बाजरी (Millet), मका (Maize), मुग (Moong), उडीद पिकांच्या (Urad) पेरणीनंतर पावसाने दडी मारली होती. पिके माना टाकू लागल्याने खरीप हंगाम हातचा जाणार म्हणून शेतकरी राजाच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासुन धो धो नसला तरी रिमझिम पाऊस (Rain) सुरु आहे. या पावसाने खरीपाच्या पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. पिके वाचल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधानाच्या छटा दिसू लागल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com