कुरघोडीच्या राजकारणाचा कळस

कुरघोडीच्या राजकारणाचा कळस

टाकळीभानमध्ये राजकीय पटलावर चलबिचल

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

नेहमीच सुस्कृंतपणाचे राजकारण करणार्‍या टाकळीभानमध्ये (Takalibhan) काही दिवसांपासून कुरघोडीच्या राजकारणाला (Political) सुरवात झाली आहे. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्याला राजकीय दिशा देणार्‍या या गावचे राजकारण (Political) आता तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. वाढत्या कुरघोड्यांमुळे टाकळीभानच्या राजकीय पटलावर गावपुढार्‍यांमध्ये चांगलीच चलबिचल झालेली दिसून येत आहे.

निवडणुकीपुरते राजकारण (Political) व इतरवेळी समाजकारण ही टाकळीभानच्या (Takalibhan) राजकारणाची आतापर्यंतची खासियत आहे. त्यामुळेच येथील राजकारणाचा आदर्श तालुक्यातील गावे घेत आली. वारेमाप चिखलफेक करणारे गावपुढारी (Village Political Leder) निवडणुकीतील जय पराजय विसरुन गावाच्या विकासासाठी हातात हात घालून विकास साधत होते. त्यामुळेच तालुक्यातील विकसनशिल गाव म्हणून या गावाची ओळख झाली आहे. तालुक्यातील नेतेही या गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यास मेहरबान होत होते. टाकळीभान सरंपंच व चेअरमन यांना तालुक्यात सन्मान मिळत होता.

गेल्या काही दिवसांपासुन येथील खेळीमेळीचे राजकारण लयास जावून त्याची जागा कुरघोडीच्या राजकारणाने (Political) घेतली आहे. दिवसेंदिवस कुरघोड्या वाढत असून गावाच्या खेळीमेळीच्या विकासात दरी पडताना दिसत आहे. याची सुरवात सेवा सोसायटीच्या (Service Society) राजकारणापासून गेल्या सात-आठ वर्षापासून झाली आहे. आजही सेवा सोसायटीत कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याने साडे पाच वर्षांपुर्वी सोसायटीची निवडणूक (Society Election) होऊन निकाल न्यायप्रविष्ट आहे. सोसायटीचे कामकाज तेंव्हापासून प्रशासक पाहत आहेत. त्यामुळे दोनवेळा कर्जमाफी होवूनही अनेक सभासद किरकोळ कारणावरुन कर्जमाफीचे लाभार्थी होवू शकले नाहीत. साडेपाच वर्षे उलटुनही माजी संचालकांमधील कुरघोडी संपली नसल्याने कोर्टाच्या वार्‍या सुरु आहेत. ‘ईगो’ सोडून वाद मिटवण्याचे आवाहन काही सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी केले असले तरी त्या गावपुढार्‍यांचा ‘ईगो’ कायम आहे.

विठ्ठल मंदीर देवस्थानचे विश्वस्त व देवस्थानच्या जमिनीवरील कथीत कुळं हा विषय सध्या चांगलाच गाजत आहे. या विश्वस्त मंडळाचे राजीनामे व कथीत कुळांकडील जमीनी काढुन घेण्यासाठी सध्या वातावरण तापले आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळ व कथीत कुळं संभ्रमावस्थेत आहेत. याच वादातून सरकारी जागेवरील अतिक्रमणावरून ग्रामपंचायत सदस्यांचे पद रद्द करण्याच्या वादाला तोंड फुटले आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे विवाद अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या सदस्यांचे सदस्यपदही टांगणीला लागले आहे. विद्यमान सदस्य या प्रकाराने दुखावले गेल्याने तेही आता नव्या कुरघोडीच्या शोधात असणार आहेत यात शंका नाही.

एकूणच टाकळीभानमध्ये सध्या कुरघोडीच्या राजकारणाचा कळस होत असून त्याचा विकासावर परीणाम होत आहे. सामान्य नागरीकांचे प्रतिनिधीत्व करीत असलेले गावपुढारीच कुरघोड्यांचे राजकारण करीत असल्याने नागरिकांच्या प्रश्नासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रश्न कोणाकडे मांडायचे हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे. सामान्यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या या गावपुढार्‍यांनी ‘ईगो’ बाजुला ठेवून पुर्वीसारखा हातात हात घालून विकास साधावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com