टाकळीभान रुग्णकल्याण समितीची बैठक खेळीमेळीत

टाकळीभान रुग्णकल्याण समितीची बैठक खेळीमेळीत

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णकल्याण समितीच्या नूतन सदस्यांची बैठक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली. जिल्हा परीषद सदस्या संगीताताई गांगुर्डे अध्यक्षस्थानी होत्या तर प. स. सदस्या वंदना मुरकुटे, सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, सदस्या अर्चना पवार, मनीषा नवले, अबासाहेब रणनवरे, पत्रकार चंद्रकांत लांडगे, तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे व समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.

मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन करण्यात आले व त्यास सदस्य मंडळाने मंजुरी दिली. रुग्णकल्याण समितीच्या येणार्‍या एक लाख तीस हजार रुपये निधीच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले. प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. राम बोरुडे यांच्याकडून शिपाई एकच असल्याने त्यासोबत एक शिपाई पूर्ववत करण्यात आला. त्यावर एक दिवसाड दुसरा शिपाई काम करेल, अशी सूचना तालुका आरोग्यधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी केली. पंचायत समितीच्या सदस्या डॉ.वंदना मुरकुटे म्हणाल्या कि, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अडचण येत असलेल्या गोष्टीबद्दल मागणी करत नाहीत. त्यामुळे लेखी पत्र देऊन मागणी करावी व त्याचा पाठपुरावाही करावा. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतकडून मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

उपसरपंच कान्होबा खंडागळे यांनी, आरोग्य केंद्रातील साफसफाई व स्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रसुती झालेल्या महिलांना बेडअभावी जमिनीवर झोपावे लागत असल्याने कान्होबा खंडागळे यांनी ग्रामपंचायतीच्या कोविड सेंटरमधील काही बेड आरोग्य केंद्रात स्वखर्चाने पोहच करण्याची व्यवस्था केली. अशी वेळ परत येणार नाही याची काळजी घ्या, असा इशाराही दिला. आरोग्य केंद्राच्या आवारात असलेले स्वच्छतागृह रुग्णांच्या नातेवाईकांपेक्षा समोरील गाळेधारकच सर्रास वापर करीत असल्याने आरोग्य केंद्राच्या परीसरात अस्वच्छता व दुर्गंधी होत असल्याने याठिकाणी लोखंडी जाळीचे कुंपण करून बंदोबस्त करावा, अशी मागणी आबासाहेब रणनवरे यांनी केली.

नूतन रुग्णकल्याण समितीची ही पहिलीच बैठक असल्याने ती खेळीमेळीत पार पडली असली तरी योग्यप्रकारे व रुग्ण केंद्रबिंदू मानून कामकाज करण्याच्या सूचना सर्वच सदस्यांनी दिल्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव, डॉ. बोरुडे, डॉ. केदारी, आरोग्य कर्मचारी श्रीमती तोरणे, सय्यद, चेमटे आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्य केंद्रातील साफसफाई करण्यासाठी मानधन तत्त्वावर ठेवण्यात आलेल्या महिलेने दोन हजार रुपयांत आपला उदर निर्वाह होत नसल्याने वाढीव मानधनाची बैठकीत मागणी केली असता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी एक दिवसआड काम करावे असे सांगितले.परंतु त्या महिलेच्या मागणीनुसार वाढीव मानधन रकमेची जबाबदारी ग्रामपंचायत स्वीकारेल असे उपसरपंच कान्होबा खंडागळे यांनी सांगितल्याने साफसफाईचा प्रश्न निकाली निघाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com