टाकळीभान येथील उपबाजारात कांद्याला 1 हजार 900 रुपये भाव

टाकळीभान येथील उपबाजारात  कांद्याला 1 हजार 900 रुपये भाव

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Shrirampur Agricultural Produce Market Committee) टाकळीभान (Takalibhan) येथील उपबाजारात (sub market) करोनाचे नियम पाळीत कांद्याची चांगली आवक (Onion Inward) सुरू आहे. काल मंगळवारी झालेल्या लिलावासाठी 4 हजार 284 कांदा गोण्यांची आवक झाली होती.

यावेळी एक नंबरच्या कांद्याला (Onion) 1 हजार 400 ते 1 हजार 900 रुपये, दोन नंबरला 750 ते 1 हजार 300 रुपये, तीन नंबरला 200 ते 650 रुपये तर गोल्टी कांद्याला (Onion) 600 ते 1 हजार 150 रुपयाचा दर मिळाला. करोनाच्या संकटामुळे शासकिय नियमांचे (Government rules) पालन करीत लिलाव प्रक्रिया होत आहे.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना परीसरातील कांदा बाजारच्या तुलनेतजादा दर मिळत असल्याने आपला कांदा विक्रीसाठी अणावा, असे आवाहन सभापती संगीता शिंदे, उपसभापती नितीन भागडे, संचालक नानासाहेब पवार, विद्याताई दाभाडे, सचिव किशोर काळे, उपबाजार व्यवस्थापक दिनकर पवार यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com