टाकळीभानचा कांदा बाजार आता रविवारीही सुरू राहणार

टाकळीभानचा कांदा बाजार आता रविवारीही सुरू राहणार
कांदा उत्पादक

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात करोनाचे नियम पाळत आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी कांदा मार्केट सुरू आहे. सध्या खरीप हंगाम सुरू झालेला असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक अडचण होऊ नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने आठवड्यातून तीन दिवस कांदा मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आठवड्यातील रविवारीही कांदा मार्केट सुरू राहणार आहे.

त्यामुळे आठवड्यातील मंगाळवार, शुक्रवार व रविवार हे तीन दिवस टाकळीभान उपबाजारातील कांदा मार्केट सुरू राहणार असल्याने या तीनही दिवशी शेतकर्‍यांनी आपला कांदा विक्रिसाठी अणावा, असे आवाहन सभापती संगीता शिंदे, उपसभापती नितीन भागडे, संचालक नानासाहेब पवार, विद्याताई दाभाडे, सचिव किशोर काळे, उपबाजार व्यवस्थापक दिनकर पवार यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com