टाकळीभानमध्ये जेष्ठांचा सत्तेत एकतेचा नारा

अपात्रतेच्या कारवाईमुळे सदस्य एक होणार का?
टाकळीभानमध्ये जेष्ठांचा सत्तेत एकतेचा नारा

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

येथील ग्रामपंचायतीची एकमुखी सत्ता मिळालेल्या सत्ताधारी गटात वर्षापासून धुसफुस सुरु असल्याने त्याचा ग्रामविकासावर परीणाम होत आहे. नुकतीच झालेली ग्रामसभा याच मुद्यावर होवून विरोधकासह सत्ताधारी गटाच्या जेष्ठांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात एकतेचा नारा दिला. असे आसले तरी नुकत्याच झालेल्या 10 सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाईमुळे सदस्य एक होणार का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील या ग्रामपंचायतीच्या जानेवारी 2021 मध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत पुर्वीच्या सत्ताधारी गटाचा धुव्वा उडवत मतदारांनी नव्या दमाच्या तरुणांच्या हाती सत्ता दिली. 17 पैकी 16 सदस्यांची एकहाती सत्ता महाविकास आघाडीकडे दिली. मुरकुटे गट, काँग्रेसचे आ. कानडे व ससाणे दोन्ही गट, रिपाई, शिवसेना व इतर संघटना एकत्र येऊन महाविकास आघाडीला जन्म झाला. सरंपच-उपसरपंच निवडीत मुरकुटे गटाने बाजी मारुन प्रथम संधी घेतली होती. सरपंच पदासाठी तिन्ही पात्र महीलांना तर उपसरपंचपदी प्रत्येक वर्षी एका सदस्याला संधी देण्याचा अलिखित फार्म्युला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरवला होता.

मात्र महाविकास आघाडीचा हा संसार फार काळ सुरळीत चालला नाही. सहा महिन्यातच धुसफुस सुरु होवून सरपंच गट व उपसरपंच गट अस्तित्वात आले. सरपंच गटाकडे महाविकास आघाडीतील मुरकुटे गट तर उपसरपंच गटाकडे महाविकास आघाडीतील मुरकुटे गट वगळता इतर सर्व अशी फाळणी झाली. आणि पुढील काळात कुरघुडीच्या राजकारणाला सुरवात झाली. दोन्ही गटातील कुरघुड्या एवढ्या वाढल्या की सदस्यांना विकास कामासाठी वेळ देणे अवघड होवुन बसले आहे. हेवेदावे थेट वैयक्तिक पातळीपर्यंत गेल्याने समोरासमोर भिडण्याची भाषा वापरली जात असल्याचे अनेकदा ऐकीवात येते. त्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. तरुणाईवर विश्वास व्यक्त करुन भरभरुन मतांचे दान कणारे मतदारच दहशतीच्या सावटाखाली असल्याने दिसून येत आहे.

ग्रामपंचायतीची नुकतीच मोठ्या पोलीस बंदोबस्तात झालेल्या ग्रामसभेत सदस्यांमधील इगोचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीचाच मुद्दा प्रामुख्याने चर्चिला गेला. स्वातंत्र्यानंतर कालपर्यंत झालेल्या ग्रामसभा कधीही पोलीस संरक्षणात झालेल्या जेष्ठ ग्रामस्थांनी पाहिल्या नाहीत. मात्र वर्षभरातच ग्रामसभेला पोलिसांच संरक्षण का? असा सुर जेष्ठांनी मनोगतातून आळवला. माजी उपसरपंच तथा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे यांनी प्रथमच ग्रामसभेसाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करावा लागला.

याबाबात नाराजी व्यक्त करीत सदस्यांमधील कुरघुड्यांमुळे दहशतीचे वातावरण पसरले असल्याचे चित्र आहे असे सांगुन मतदारांनी विश्वासाने सत्ता दिेली आहे. आपसातील मतभेद विसरुन मतदारांच्या व गावाच्या विकासासाठी काम करा. दहशत थांबवा. एकोप्याने काम करा, असा सल्ला दिला. तर माजी सभापती नानासाहेब पवार प्रमुख विरोधक असुनही सत्ताधारी गटाने अंतर्गत सुरु असलेले कुरघुडीचे राजकारण थांबवून एकदिलाने काम करावे व गावातील दहशत कमी करुन गावाच्या विकासावर भर द्यावा, असे सुचित केले तर महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते मंजाबापू थोरात यांनीही सदस्यांचे कान टोचुन दहशतमुक्त गाव करण्यासाठी सर्व सदस्यांमध्ये एकोपा झाला पाहिजे व येणारी ग्रामसभा भयमुक्त वातावरणात पार पडली पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.

सर्वच जेष्ठांनी ग्रामसभेत एकतेचा नारा दिला मात्र दुसर्‍याच दिवशी जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात दाखल असलेल्या सदस्यांच्या सरकारी जागेतील अतिक्रमणाच्या विवाद अर्जाचा निकाल लागुन थेट 10 सदस्य अपात्र झाले. त्यामुळे एकिकडे एकतेचा नारा तर दुसर्‍याच दिवशी झालेली आपात्रतेची कारवाई हा योगायोगच समजायचा की आणखी काही? ग्रामपंचायत सदस्यांमधील दुहीचे व त्यातुन निर्माण झालेल्या दहशतीचे पडसाद थेट ग्रामसभेत उमटल्याने विरोधकांसह सत्ताधारी गटाच्या जेष्ठ नेत्यांनीही एकोप्याचा सल्ला दिला असला तरी हा एकोपा होणारा का? आणि झाला तरी अपात्रतेच्या कारवाईमुळे किती कालावधी साठी होणार? हे पहावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com