टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपुर तालुक्यातील महत्वाच्या आसलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या सदस्य मंडळाच्या पंचवार्षीक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आसुन

काल शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी इच्छुकांनी ऑनलाईन पध्दतीने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पहिले दोन दिवस एकही अर्ज दाखल झाला नव्हता. अर्ज दाखल करण्यासाठी काहींनी कालचा एकादशीचा मुहुर्त साधला आहे.

टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुक रंगतदार होणारआसल्याचे वर्षभरापासुन संकेत मिळत होते. सदस्य मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकिसाठी 23 डिसेंबर पासुन सुरवात झालेली आहे. 30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्जासोबत जोडण्यात येणार्या कागदपत्रांची पुर्ता करणे किचकट असल्याने व ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात येत असल्याने अनेकांची भंबेरी उडताना दिसत आहे. त्यातच सलग तीन दिवस सुट्या येत असल्याने महत्वाचे दाखले मिळवण्यासाठी अडथळे येत आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या आज तिसर्या दिवशी टाकळीभान येथे अर्ज दाखल झाले. लोकसेवा महाविकास आघाडीकडुन संतोष अशोक खंडागळे यांनी प्रभाग 3 मधुन मागासाचा प्रवर्ग तर प्रभाग 4 मधुन सर्वसाधारण जागेसाठी असे दोन अर्ज दाखल केले आहेत. सुनिल तुकाराम बोडखे यांनी प्रभाग 2 मधुन सर्वसाधारण तर प्रभाग 3 मधुन मागासाचा प्रवर्ग असे दोन अर्ज दाखल केले आहेत.

कविता सुनिल बोडखे यांनी प्रभाग 2 व 4 मधुन मागासाचा प्रवर्ग असे दोन अर्ज दाखल केले आहेत तर अशोक कारखाण्याचे संचालक दत्ताञय कुंडलीक नाईक यांनी प्रभाग 6 मधुन सर्वसाधारण जागेसाठी अर्ज दाखल केला आहे. तर ग्रामविकास मंडळाकडुन प्रभाग 1 मधुन सर्वसाधारण जागेसाठी आबासाहेब आहेर, सर्वसाधारण महीला देविका एकनाथ रणनवरे, शोभा राजेंद्र रणनवरे, तर मागासाचा प्रवर्ग महीला म्हणुन सुवर्णा आविनाश लोखंडे, जमुना बापु गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत.

प्रभाग 2 मधुन मागासाचा प्रवर्ग महीला साठी माया नवनाथ पटारे, ज्योती बापुसाहेब शिंदे, वंदना भाऊसाहेब पटारे. आनु. जाती मतदार संघातुन वर्षा किशोर गाढे व चिञसेन लक्ष्मण रणनवरे. प्रभाग 3 मधुन मागासाचा प्रवर्ग मधुन बापुसाहेब केरु शिंदे, बापु दगडु गायकवाड यांनी तर सर्वसाधारण महीला मतदार संघातुन राजश्री राजेंद्र मानेव जमुना बापु गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत.

प्रभाग 4 मधुन मागासाचा प्रवर्ग महिला म्हणुन पुष्पलता भाऊसाहेब मगर, वंदना भाऊसाहेब पटारे यांनी तर अनु. महिला मतदार संघातून शितल चित्रसेन रणनवरे व सिमा गणेश साळवे यंनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग 5 मधुन आनु जाती मतदार संघातुन चिञसेन लक्ष्मण रणनवरे यांनी तर अनु. जमाती महीला मतदार संघातुन साखरबाई नंदु गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत.

प्रभाग 6 मधुन सर्वसाधारण पुरुष मतदार संघातुन दिपक शंकर पवार, भाऊसाहेब नानासाहेब पवार तर मागासाचा प्रवर्ग पुरुष मतदार संघातुन अविनाश जगन्नाथ लोखंडे, आनिल दत्ताञय दाभाडे तर अनु जाती महीला मतदार संघातुन शितल चिञसेन रणनवरे असे एकुण 25 अर्ज दाखल झाल्याने एकुण दाखल झालेल्या अर्जांची संख्या 32 झाली आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या नेत्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणार्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी भंबेरी उडत आसल्याने अर्ज दाखल करण्यासाठी वेळ लागत आहे. यंदा इच्छुकांची शंभरी पार होण्याचे संकेत मिळत असल्याने आर्ज माघारीसाठी प्रमुखांना मोठी डोकेदुखी होणार हे मात्र नक्की.