टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 20 अर्ज

दाखल उमेदवारी अर्जाची संख्या 52 वर
टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 20 अर्ज

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्वभागातील महत्वाच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल चौथ्या दिवशी

ऑनलाईन 20 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे दाखल अर्जांची संख्या आता 52 वर पोहचली आहे.

टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आ. लहु कानडे, माजी आ. भानुदास मुरकुटे व माजी आ. स्व. जयंतराव ससाणे यांच्या लोकसेवा महाविकास आघाडीकडुन 11 इच्छुकांनी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

त्यामध्ये प्रामुख्याने मयुर अशोकराव पटारे यांनी प्रभाग 2 व 4 मधुन सर्वसाधारण, लता भाऊसाहेब पटारे प्रभाग 2 मधुन मागासाचा प्रवर्ग, कल्पना जयकर मगर यांनी प्रभाग 4 मधुन, अर्चना यशवंत रणनवरे व कविता मोहन रणनवरे यांनी अ.जाती मतदार संघातुन प्रभाग 4 व 6 मधुन, सुनिल बापुराव ञिभुवन यांनी प्रभाग 5 मधुन, गोरख अण्णासाहेब दाभाडे, विलास भाऊसाहेब दाभाडे व विलास अण्णासाहेब दाभाडे यांनी प्रभाग सहामधुन मागासाचा प्रवर्ग मतदार संघातुन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील गटाचे माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखालील ग्रामविकास मंडळाच्यावतीने राहुल आप्पासाहेब पटारे यांनी सर्वसाधारण मतदार संघातून प्रभाग 2 व 4 मधुन, दिलीप धोंडीराम पवार यांनी मागासाचा प्रवर्ग मतदार संघात प्रभाग 3 मधुन, दिपक शंकर पवार प्रभाग 1 मध्ये सर्वसाधारण मतदार संघातुन, सिमा गणेश साळवे यांनी अनु. जाती मतदार संघात प्रभाग 4 मधुन तर आशा गणेश रणनवरे यांनी प्रभाग 6 मधुन, प्रभाग 5 मधुन गितांजली राजु गांगुर्डे यांनी अनु. जाती मतदार संघातून तर राणी दिपक बोडखे यांनी सर्वसाधारण महीला मतदारसंघातुन तर एकनाथ विठ्ठल पटारे यांनी प्रभाग 4 मधुन सर्वसाधारण मतदार संघातुन आनंद अशोक रणनवरे यांनी प्रभाग 5 मधुन अनु.जाती मतदार संघातुन अर्ज दाखल केला आहे.

याव्यतिरीक्त मुकुंद राजाराम हापसे यांनी प्रभाग 1 व 6 मधुन स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ रामभाऊ पाबळे स्वतंत्र निवडणुक लढण्याच्या तयारीत असल्याने या निवडणुकीत अपक्ष उमेदवारही असल्याने त्या त्या प्रभागात निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com