टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नव्याने15 अर्ज दाखल

एकूण दाखल अर्जाची संख्या 67
टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नव्याने15 अर्ज दाखल

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकिसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी रविवारची सुट्टी असतानाही

ऑनलाईन 15 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे 17 सदस्यांसाठी 67 अर्ज काल रविवार अखेर दाखल झाले आहेत.

श्रीरामपुर तालुक्याच्या पुर्वभागातील 17 सदस्य संख्या आसलेली टाकळीभान ही मोठी ग्रामपंचायत आहे. गावाच्या वाढत्या लोकसंख्येनुसार गावाचा विस्तारही मोठ्या प्रमाणात होत आसल्याने ग्रामविकास पाहीजे तेवढ्या वेगाने होत नसल्याने व सत्ताधारी सर्व प्रभागातील विकासासाठी कमी पडत असल्याने सत्ताधारी गटावर नागरीकांची दिवसेंदिवस नाराजी वाढलेली दिसत आहे.

त्याचाच एक भाग म्हणुन ग्रामपंचायत सदस्य होवुन गावाचा सर्वांगिण विकास साधण्याच्या हेतुने इच्छुकांची गर्दी वाढत असलेली दिसुन येत आहे. ईच्छुकांमध्ये तरुणांचा मोठा भरणा आहे. प्रथमच सदस्य होण्यासाठी बरेच तरुण निवडणुकिच्या आखाड्यासाठी सज्ज झालेले आहेत.

काल अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी लोकसेवा महाविकास आघाडीच्या 15 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज ऑनलाईन दाखल केले आहेत. प्रभाग 1 मधुन सर्वसाधारण पुरुष मतदार संघातुन बाळासाहेब जयवंत सपकळ, विलास बाळासाहेब सपकळ व गोकुळ दत्तात्रय नाईक, सर्वसाधारण स्त्री मतदार संघातुन मंगल बाळासाहेब सपकळ, बेबी संजय रणनवरे, छाया योव्हान रणनवरे, आशा राजेंद्र रणनवरे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

प्रभाग 2 मधुन आनु. जाती मतदार संघातुन अशोक लालचंद कचे व सुनिल बापुराव त्रिभुवन, प्रभाग 3 मधुन संतोष अशोक खंडागळे यांनी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग 5 मधुनसुनिता दिपक कोकणे व दिपाली सचिन खंडागळे यांनी सर्वसाधारण मतदार संघातुन अर्ज भरला आहे. तर प्रभाग 5 मधुनच आ. जाती महीला मतदार संघातुन कालिंदा बाबासाहेब गायकवाड व रतन रामदास अहिरे यांनी अर्ज दाखल केला आहे.

प्रभाग 3 मधुन मागासाचा प्रवर्ग श्ञी मतदार संघातुन भाग्यश्री गणेश नागले यांनी अर्ज दाखल केला आहे. ग्रामविकास मंडळाकडुन काल रविवारी एकही अर्ज दाखल होवु शकला नाही. उमेद्वारी अर्ज दाखल करण्यासाठी अजुन तीन दिवसांचा अवधी असल्याने व शासकिय कार्यालये सलग तीन दिवस बंद असल्याने आज सोमवारपासुन कागद पत्राअभावी अपूर्ण असलेले अर्ज दाखल करण्यास पुन्हा सुरुवात होणार असल्याने उरलेल्या तीन दिवसात दाखल अर्जांची शंभरी पूर्ण होणार का? हे पहावे लागेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com