टाकळीभान येथील घरकुल यादीचा फेरसर्व्हे करावा

भाजपाचे आज ग्रा. पं. कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन
टाकळीभान येथील घरकुल यादीचा फेरसर्व्हे करावा

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी घरकुल यादी बनविताना राजकारण करून पात्र लाभार्थी वगळून मर्जीतील लाभार्थ्यांची नावे समाविष्ट केली असल्याचा आरोप माजी सभापती नानासाहेब पवार यांनी केला असून घरकुल यादीचा फेरसर्व्हे करावा, या मागणीसाठी आज सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा, भाजपा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टाकळीभान ग्रामपंचायत प्रशासनाने घरकुल यादी बनविताना राजकीय द्वेषातून गरजू गोरगरिबांची नावे जाणुनबुजून वगळली आहेत. घरकुल यादी करताना सत्तेचा गैरवापर करून मोठा घोळ घातला आहे. घरकुल पात्र यादीतून काही गरजू लाभार्थ्यांची नावे वगळली आहेत. पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवून मर्जीतील लोकांची नावं यादीत समाविष्ट केली आहेत. त्यामुळे गोरगरीब पात्र लाभार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे निवेदनाद्वारे फेरसर्व्हे करण्याची मागणी करून सोमवार दि.13 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनावर माजी सभापती नानासाहेब पवार, मधुकर कोकणे, नारायण काळे, मुकुंद हापसे, कृष्णा वेताळ, चित्रसेन रणनवरे, रमेश धुमाळ, अनिल दाभाडे, भरत गुंजाळ, लक्ष्मण जाधव, नवाज शेख, अविनाश लोखंडे, शिवाजी धुमाळ, बापु गायकवाड, रमेश पटारे, शंकर शिंदे, बापूसाहेब नवले, शनेश्वर दहे, बापू माने आदींची नावे व सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com