टाकळीभान परिसरात पोलिसांचा गावठी दारू अड्ड्यांवर छापा

1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चौघांविरूध्द गुन्हा दाखल
टाकळीभान परिसरात पोलिसांचा गावठी दारू अड्ड्यांवर छापा

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान परिसरातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू असा 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दारू अड्डे उद्ध्वस्त केले. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन महिलांसह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाल्याने त्यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी टाकळीभान परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आला. तेथून 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यावेळी संजय कारभारी गांगुर्डे (रा. माळेवाडी, टाकळीभान), गणपत डुकरे (रा. टाकळीभान), यांचेकडून 42,000 रु. किमतीचेे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 2500 रुपये किमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, शांताबाई गणपत जाधव (रा. गावठाण, टाकळीभान) हिच्याकडून 31,500 रुपये कि.चे 450 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 2000 रू. किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, आशाबाई शिवाजी पवार (रा. गावठाण, टाकळीभान) हिच्याकडून 35,000 रुपये कि.चे 500 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व 2000 रू. किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा वरील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक संदीप मिटके यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र आरोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश औटी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, निखिल मसराम, मारुती माळी, पोलीस कॉन्स्टेबल प्रज्ञा डोंगरे, पल्लवी तुपे व आरसीपीच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com