टाकळीभानमध्ये करोनाचा वाढता आलेख

संपूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता
टाकळीभानमध्ये करोनाचा वाढता आलेख

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

राज्यभर करोनाचा प्रकोप वाढत आसताना करोना रुग्णसंख्येत टाकळीभान गावतही करोना रुग्णसंख्येचा आलेख वाढता आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी संपुर्ण व्यवहार किमान आठ दिवसांसाठी बंद ठेवुन कडक लॉकडाऊन स्थानिक पातळीवर तरुणांच्या मदतीने घेण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याने आज ग्रामपंचायतीने निवडक सर्वपक्षीय कार्यकत्यांची बैठक आयोजित केली आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत टाकळीभान ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे खबरदारी घेत करोनाचे कंबरडे मोडले होते. पहील्या लाटीत सहा ते सात महिन्याच्या कालावधीत या मोठ्या लोकसंख्येच्या गावात केवळ 18 करोनाबाधीत रुग्ण आढळले होते. योग्यवेळी उपचार घेतल्याने ते सर्व रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने मृत्युदर शुन्य होता. मात्र दुसर्‍या लाटेत करोनाने कहर केला आहे. गेल्या तीन महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तपासणीत 3 ते 4 रुग्ण करोनाबाधीत सापडत आहेत. सर्वच रुग्णांना उपचाराची सुविधा मिळत नसल्याने मृत्यु दरही वाढत आहे. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त रुग्ण करोना बाधीत झालेले आहेत. तर वेगवेगळ्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. दहा पेक्षा जास्त रुग्णांचा करोनाने बळी घेतलेला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भयावह ठरलेली आहे.

वाढती करोना रुग्ण संख्या पहाता सर्व व्यवहार बंद ठेवुन कडक लाकडाऊन घेवुन करोनाची साखळी तोडणे गरजेचे झाले आहे. हा लॉकडाऊन किमान आठ दिवसांचा असावा. या कालावधीत सर्व व्यवहार बंद ठेवुन सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळणे गरजेचे आहे. विनाकामाचं घराबाहेर पडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. तरुणांनी माझं गाव माझी जबाबादारी स्विकारुन प्रत्येक कुटुंबाने माझं कुटुंब माझी जबाबदारी स्विकारली पाहिजे. असे मत सुज्ञ नागरीकांकडुन व्यक्त केले जात आहे. त्यामुळेच करोनाचा वाढता आलेख पहाता टाकळीभान ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना रणनवरे व उपसरपंच कान्होबा खंडागळे यांनी आज 12 मे रोजी सर्वपक्षीय निवडक कार्यकर्त्यांची बैठक ग्रामसचिवालयाच्या सभागृहात बोलवली आहे. या बैठकित काय निर्णय होतो हे पहावे लागेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com