टाकळी फाटा येथे इमारतीवर पोलिसांची धाड

तिरट खेळणार्‍या 28 आरोपींना साडेतेवीस लाखांच्या मुद्देमालासह अटक
टाकळी फाटा येथे इमारतीवर पोलिसांची धाड

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

शिवसेना ठाकरे गटाच्या व्यापारी सेनेच्या तालुका प्रमुखांच्या शहरातील टाकळी फाटा धोंडीबानगर कोपरगाव येथे असलेल्या इमारतीच्या टेरेसवर काही व्यक्ती पैशावर खेळला जाणारा तीन पत्त्याचा तिरट नावाचा हार जीतीचा जुगार खेळत असताना पोलिसांनी धाड टाकून 28 आरोपींसह साडे तेवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टाकळी फाटा धोंडीबानगर येथे योगेश बन्सी मोरे यांच्या इमारतीच्या टेरेसवर काही व्यक्ती पैशावर खेळला जाणारा तीन पत्त्याचा तिरट नावाचा हार जीतीचा जुगार खेळतात, अशी गुप्त बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर, शिर्डी पोलीस ठाणे व कोपरगाव पोलीस ठाण्याच्यावतीने वरील ठिकाणी जाऊन इमारतीच्या जिन्यातून टेरेसवर तीन ठिकाणी गोलाकार बसलेले काही व्यक्ती होते. प्रत्येकाच्या हातामध्ये जुगार खेळण्याचे तीन पत्ते होते. तसेच मध्यभागी काही पत्ते व पैसे होते.

पोलिसांनी अचानक छापा टाकून त्याठिकाणी शेखलाल शेख चाँद (रा. चर्च रोड कोपरगाव), शीतल सुभाष लोहाडे (रा. सावतानगर मालेगाव), विजय केदू निमसे (रा. रमाबाईनगर मनमाड), नंदु पुंजा नजन (रा. बनरोड राहाता), इम्रान याकूब मोमीन (रा. जमदाडे चौक मनमाड), कलिम भिकन बागवान (रा. इंदिरानगर, कोपरगाव), अश्पाक जमील शेख (रा. शांतीनगर मनमाड), नितीन उत्तम शेजवळ रा. राजवाडा, लासलगाव, ता. निफाड), राहुल दिलीप पाराशेर (रा. मनमाड आनंदवाडी), नाना शबा डोळस (रा. सुभाषनगर, कोपरगाव), शेख अमजद हाशम (रा. खडकी ता. कोपरगाव), सुरेश कुंडलिक सातभाई (रा. येवला), गणेश विठ्ठल जेजुरकर (रा. पानमळा, शिर्डी), सोमनाथ बापू वाळके (रा. लासलगाव), अनिल देवराम खरात (रा. लासलगाव ब्राम्हणगाव ता. निफाड), योगेश मुकुंद रासकर (रा. येवला), दिपक रामदास उंबरे (रा. येवला), कैलास अशोक मुंजळ (रा. महादेवनगर), तुषार राजेंद्र दुशिंग (रा. टिळकनगर), मोहसीन कलंदर सय्यद (रा. सुराळा ता. वैजापूर), दीपक मायकल बनसोडे (रा. स्वामी समर्थनगर, वैजापूर), रवींद्र माधव सानप (रा. येवला रोड, कोपरगाव), हरिलाल फकिरा डांच (रा. संगमेश्वर, मालेगाव), सुदाम पंढरीनाथ नवले (रा. तांबोळ, ता. अकोले), सुभाष लक्ष्मण चावडे (रा. बाभुळवंडी, ता. अकोले), हरी दगडु करवर (बाभुळवंडी, ता. अकोले), विरेंद्र अरुणसिंग परदेशी (रा. येवला), युनूस इकबाल शेख (रा. खडकी) अशा 28 जणांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून रोख 2 लाख 5 हजार 670 व 1 लाख 89 हजार 700 रुपये किंमतीचे विविध कंपनीचे 30 मोबाईल व 19 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 4 चारचाकी वाहने (क्रेटा कार क्रमांक एमएच-12 क्युएफ- 1553, तवेरा कार क्रमांक एमएच-13 एएच- 4444, स्कोडा ऑक्टीव्हीया कार क्रमांक एमएच-03 एएम-6782, आल्टो कार क्रमांक एमएच-41 बीए-8367 व 7 दुचाकी वाहने व पत्ते असा एकूण 23 लाख 35 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वरील सर्व आरोपींना अटक केली आहे.

याप्रकरणी पो. ना शंकर चौधरी यांच्या फिर्यादीवरून वरील सर्व आरोपींविरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गु. रजि नंबर 397/2022 म.जु.का. कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप नि. रोहिदास ठोंबरे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com