शाळेच्या मेसमध्ये आलेला बिबट्या जेरबंद !

शाळेच्या मेसमध्ये आलेला बिबट्या जेरबंद !

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर (Takali Dhokeshwar) येथील जवाहर नवोदय विद्यालयातील (Jawahar Navodaya Vidyalaya) मेसमध्ये (mess) बुधवारी सकाळी भक्ष्याच्या शोधार्थ आलेला बिबट्या (Leopard) अलगद पिंजर्‍यात अडकला(Stuck in a cage). या बिबट्याला (Leopard) पाहण्यासाठी टाकळी ढोकेश्वर व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हा बिबट्या साधारण एक ते दीड वर्ष वयाचा आहे. त्याला पकडण्यासाठी पारनेर व जुन्नर वन विभागातर्फे (Parner and Junnar Forest Department) बुधवारी दुपारी कोम्बो ऑपरेशनला सुरूवात (Combo operation begins) करण्यात आली होती. टाकळी ढोकेश्वर वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रताप जगताप (Takli Dhokeshwar Forest Ranger Pratap Jagtap) यांच्यासह एस. एन. भालेकर, एम. एल. मोरे, विजय थोरात, डी. पी. दोरंगे, एन. व्ही. गायकवाड, किरण जाधव यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

बिबट्याला पकडण्यासाठी जुन्नर (Junnar) येथील पथक पाचारण करण्यात आले. वन विभागाच्यावतीने भुलीचे इंजेक्शन (Injection of forgetfulness) मारण्यासाठी जुन्नर येथून शार्पशूटर बोलविण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रताप जगताप व एस. एन. भालेकर यांनी दिली. हा बिबट्या भक्षाच्या किंवा पाण्याच्या शोधार्थ नवोदय विद्यालयाच्या (Navodaya Vidyalaya) परिसरात आला असण्याची शक्यता टाकळी ढोकेश्वर येथील वन विभागाने व्यक्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com