करोना प्रतिबंधात्मक काळजी घेऊन मतदानाचा हक्क बजवावा

तहसीलदार योगेश चंद्रे : तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींची निवडणूक तयारी पूर्ण
करोना प्रतिबंधात्मक काळजी घेऊन मतदानाचा हक्क बजवावा

कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav

तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींची तयारी निवडणूक शाखेकडून पूर्ण झाली असून नागरिकांनी मतदानाला जाताना तोंडावर मास्क लावून

करोना प्रतिबंधात्मक व्यक्तीगत काळजी घेऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

तालुक्यातील 29 ग्रामपंचायत निवडणुकीत केंद्रस्तरावर कामकाज पाहणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्क व सॅनेटायझर निवडणूक शाखेकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला आहे.

राज्य निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, दौलतराव जाधव, प्रविण लोखंडे यांचे सह निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी निवडणूक प्रक्रिया सुलभतेने होणे कामी विशेष लक्ष ठेवून असणार आहेत. 29 ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण मतदान केंद्र 112 असून 272 जागांसाठी 611 उमेदवार रिंगणात आहेत.

63785 मतदार पुरुष 32896 स्त्रिया 30889 मतदार आहेत. कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदान केंद्रस्तरावर प्रत्यक्ष कामकाज पहाणारे केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई, पोलीस कर्मचारी यांचा अंतिम समूह गठीत करून मतदान यंत्र, नियंत्रण यंत्रासह मतदान केंद्रावर आवश्यक त्या साहित्याचे वितरण करून मतदान केंद्रावर कामकाज पहाणारे समूह रवाना करण्यात आले.

तसेच टपाल मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7:30 ते दुपारी 5:30 पर्यंत मतदान असणार आहे. निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, माधवी गोरे, मनीषा कुलकर्णी, अरुण रणनवरे, यांच्यासह विविध खातेनिहाय अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com