तहसीलदार पागिरे यांच्या खासगी वाहनाला अपघात

स्वत: चालवत होत्या कार : माका परिसारातील घटना
तहसीलदार पागिरे यांच्या खासगी वाहनाला अपघात

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या खाजगी वाहनाला सोमवारी (दि.19) दुपारी पांढरीपुल-शेवगाव रस्त्यावर माका (ता. नेवासा) गावानजीक वळणावरील पूलावर अपघात झाला.

ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यात तहसीलदार पागिरे या अपघातातून बचावल्या असून त्या स्वतः कार चालवत होत्या. त्यांच्या सोबत कोणीही नव्हते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम आहे.

सोमवारी दुपारी पागिरे या शेवगावकडे येत असताना माका गावाजवळील ओढ्यावरील पुलावर त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार ओढ्यात कोसळली. सध्या माका परिसरात मुळा कॅनॉलचे पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने ओढ्याला पाणी आहे. कार ओढ्यात कोसळल्याचे नजीकचे शेतकरी व वाटसरू यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली व त्यांना सुखरूप गाडीबाहेर काढले. या अपघातात त्यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे नायब तहसीलदार रमेश काथवटे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com