ई पीक पाहणी नोंद उपक्रम शेती युगात एक क्रांतीचे पाऊल- तहसीलदार हिरे

ई पीक पाहणी नोंद उपक्रम शेती युगात एक क्रांतीचे पाऊल- तहसीलदार हिरे

राहाता |वार्ताहर|Rahata

शासनाचा नवीन ‘माझी शेती माझा उतारा मीच नोंदवणार माझा पिकपेरा’ उपक्रमात ई पीक पाहणी (E-crop inspection) या उपक्रमातून शेतकर्‍यांचा यातून वेळ तर वाचणार असून या प्रक्रियेमुळे पीक पहाणीत (Crop inspection)पारदर्शकता येणार असल्याने या योजनेमुळे शेती युगात एक क्रांतीचे पाऊल असल्याचे तहसीलदार कुंदन हिरे (Tahsildar Kundan Hire) यांनी सांगितले.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) वाकडी (Vakadi) येथे महाराष्ट्र शासनाच्या नवीन माझी शेती माझा उतारा मीच नोंदवणार माझा पीकपेरा उपक्रमात ई पीक पाहणी (E-crop inspection) या सेवेचा शुभारंभ राहाता तहसीलदार कुंदन हिरे (Rahata Tahsildar Kundan Hire), राजेंद्र लहारे यांच्या उपस्थित वाकडी (Vakadi) येथील शेतकरी अरुण विठ्ठल लहारे यांच्या शेतीत करण्यात आला.

तहसीलदार कुंदन हिरे (Tahsildar Kundan Hire) यांनी सांगितले, महाराष्ट्र शासनाच्या नवीन माझी शेती माझा उतारा मीच नोंदवणार माझा पीकपेरा उपक्रमानुसार. ई पीक पाहणी (E-crop inspection) या कार्यक्रमाअंर्तगत आता शेतकर्‍याला स्वतः आपल्या शेतात जाऊन आपल्या उतार्‍यावर तलाठी कार्यालयात येरझरे न मारता पीक पहाणी (crop inspection) लावता येणार आहे.

तलाठी श्री. बोदमवाड यांनी सांगितले की, या कार्यक्रम संदर्भात काही दिवसांपूर्वी जनजागृती म्हणून वाकडी ग्रामपंचायत (Vakadi Grampanchayat) येथे याबद्दल शेतकर्‍यांना माहिती देण्यात आली आहे. या योजनेच्या जनजागृतीसाठी गावातील ग्रामपंचायत, शेतकरी सेवा केंद्र,सोसायटी येथे देखील माहितीपत्रक लावण्यात आले आहे. या सेवेमुळे शेतकर्‍यांचा वेळ वाचणार असून हे सर्व शेतकर्‍यांसाठी बंधनकारक सुध्दा असणार आहे, असे ते म्हणाले.

याबाबत ई पीक पहाणी अ‍ॅपवर (E-crop inspection app) आपल्या शेतात जाऊन अ‍ॅपवर फोटो अपलोड (Photo Upload) करावयाचा आहे. माहिती भरताना चुकीची माहिती अपलोड होणार नाही, याची देखील दक्षता शेतकर्‍यांनी घ्यावयाची आहे. यावेळी राजेंद्र लहारे यांनी या सेवेचा वाकडी येथील शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी केले. यावेळी जि. प. सदस्या कविता लहारे, पं स. सदस्या अर्चना आहेर, अरुण लहारे, रमेश लहारे, संदीप लहारे, भास्कर गोर्डे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com