वरिष्ठ अधिकार्‍यांसह दोन शिक्षकांसह खासगी व्यक्तिंची तक्रारीत नावे

वरिष्ठ अधिकार्‍यांसह दोन शिक्षकांसह खासगी व्यक्तिंची तक्रारीत नावे

तहसीलदार देवरे यांनी 15 ऑगस्टालाचा महिला आयोगाला पाठविला होता अर्ज

अहमदनगर/पारनेर |प्रतिनिधी| Ahmednagar

तहसीलदार (Tahsildar) पदावरून कर्तव्य पार पाडत असताना तालुक्यातील लोकप्रतिनिधी (आमदार) (MLA), प्रांताधिकारी सुधाकर भोसले (Prantadhikari Sudhakar Bhosale), निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचीत (Resident Deputy Collector Sandeep Nichit), शिक्षक बाळासाहेब खिलारी (Teacher Balasaheb Khilari) आणि धोंडीबा शेटे (Dhondiba Shete) , तसेच अरुण रोडे (Arun Shete), अरुण आंधळे (Arun Andhale) या व्यक्ती प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे माझ्या कर्तव्यात अडथळा आणून मानसिक स्वास्थ व कामकाजावर परिणाम करत आहेत. त्यामुळे माझ्या मानसिक परिस्थिीचा विचार करून तात्काळ उचित मदत करावी, अशी मागणी तक्रार अर्जाव्दारे तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांनी राज्य महिला आयोगाकडे 15 ऑगस्टलाच केली होती.

राज्य महिला आयोगाला (State Women Commission) पाठवलेल्या निवेदनात देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांनी म्हटले, त्या पारनेरमध्ये दोन वर्षापासून तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. करोना (Corona) काळात त्यांनी कालावधीत रात्रंदिवस काम केलेले असून लोकांचे जीव वाचण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. तहसिलदार (Tahsildar) पारनेर (Parner) या पदावर कार्यरत असताना लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, तालुक्यातील इतर अधिकारी, काही समाजकटंक, तक्रारदार यांचेकडुन होत असलेली अवहेलना व इतर बाबींचा सविस्तरपणे महिला आयोगाला (State Women Commission) पाठवलेल्या अर्जात केलेली आहे. यात 4 ऑगस्टला पारनेर ग्रामीण रुग्णालयात कर्मचार्‍यांना झालेली मारहाण (Beating), महिला डॉक्टरांना देण्यात आलेल्या शिव्या, त्यावेळी उपस्थित असणारे पोलीस (Police) आणि शासकीय कर्मचारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

तसेच जिल्हा गौणखनिज अधिकारी वसीम सय्यद व लिपिक सांगळे हे भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये गेले असता, लोकप्रतिनिधी स्वतः व खिलारी (प्राथमिक शिक्षक) पुर्णवेळ वाळू तस्करी याने सय्यद व लिपिक सांगळे यांना मारहाण केली. तेव्हाही पोलिस लोकप्रतिनिधी समवेत उपस्थित होते. तसेच लोकप्रतिनिधी यांनी मलाही जर मी इतर पक्षांच्या विशेष करुन शिवसेनेच्या लोकांशी बोलली त्यांची कामे केली तर खोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्हयात तुम्हाला अडकवून टाकू असा दम दिलेला आहे. प्रांताधिकारी भोसले यांच्या मार्फत मला फोन करण्यात आला. प्रांताधिकारी यांनी तुम्ही लोकप्रतिनिधींचे एैका अन्यथा तुमच्यावर अ‍ॅट्रोसिटी दाखल होईल असे सांगितले. रोडे, शेटे, आंधळे यांना माझ्याविरुद्ध अर्ज, तक्रारी, उपोषण करण्यास भाग पाडले, असल्याबाबतची सविस्तर माहिती तहसीलदार देवरे यांनी महिला आयोगाला पाठविलेल्या अर्जात दिलेली आहे.

पारनेरचे लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते हे कधीही मास्क वापरत नाहीत व समोर आलेल्या नागरिकांना देखील मास्क वापरु नका म्हणुन सांगतात. त्यामुळे पारनेर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तालुक्यातील कोणत्याही दुकान सामाजिक अंतराचे पालन करत नसल्यास ते सील केले की लोकप्रतिनिधी फोन करुन दुकान बंद करु नका असे सांगतात. दुकाने बंद केली, प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहिर केली. मात्र, लोकप्रतिनिधी यांना माझ्या बद्दल मनात आकस निर्माण झाला व सुडबुद्धीने ते माझेविरुद्ध रोज नवीन तक्रारदारांना तक्रार देण्यास भाग पाडून माझे मनस्वास्थ खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तहसीलदार देवरे यांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com