देवरेंसह अन्य चौघांची चौकशीला दांडी

प्रकरणाशी निगडीत 18 व्यक्ती 13 जणांनी सादर केले म्हणणे
देवरेंसह अन्य चौघांची चौकशीला दांडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेरच्या (Parner) तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांच्यावर होत असल्याच्या अन्याय आणि पिळवणुकीची चौकशी (Inquiry) करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) यांच्या स्तरावर गठीत केलेल्या समितीने सोमवारी 18 व्यक्तींना याप्रकरणी चौकशीसाठी (Inquiry) बोलावलेले होते. पहिल्या दिवशी यापैकी 5 जणांनी दांडी मारली असून यात तक्रारदार स्वत: ज्योती देवरे (Jyoti Devare), त्यांचा वाहन चालक बाबा औटी, पारनेर रुग्णालयाच्या (Parner Hospital) दोन महिला डॉक्टर (Doctor Woman) आणि पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ (Sub-Inspector of Police Pramod Wagh) यांचा समावेश आहे.

तहसीलदार देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांची आत्महत्याचा (Suicide) करावीशी वाटते, ही ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip viral) झाल्यानंतर राज्य महिला आयोगाने (State Women Commission) त्याची दखल घेत, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल (Deputy Collector Pallavi Nirmal) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली असून यात उपजिल्हाधिकार उर्मिला पाटील (Deputy Collector Urmila Patil) आणि तहसीलदार वैशाली वाघ (Tehsildar Vaishali Wagh) या सदस्य आहेत.

या समितीने सोमवारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी (Inquiry) 18 जणांना बोलविले होते. त्यातील 13 अधिकारी, कर्मचारी आणि अन्य व्यक्ती चौकशीला येवून गेले असून तक्रारदार स्वत: ज्योती देवरे, त्यांचा वाहन चालक बाबा औटी, पारनेर रुग्णालयाच्या डॉ. मनिषा उंद्रे आणि डॉ. श्रध्दा अडसूळ आणि पोलीस उपनिरिक्षक प्रमोद वाघ हे चौकशीला गैरहजर असल्याची माहिती महसूल विभागाच्या सुत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com