तहसीलदार देवरे यांनी केला सहा कोटींचा गैरव्यवहार

लंके समर्थकांची लोकआयुक्तांकडे तक्रार
तहसीलदार देवरे यांनी केला सहा कोटींचा गैरव्यवहार

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर (Parner) येथील तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांच्या विरुध्द आ. निलेश लंके (MLA Nilesh Lanke) समर्थक राहुल झावरे (Rahul Zaware), संदीप चौधरी (sandip Chaudhari), ज्ञानेश्वर लंके (Dnyaneshwar Lanke) व सुहास सालके (Suhas Salke) यांनी थेट लोकायुक्त यांच्याकडे सुमारे सहा कोटी रुपयांचा गैरव्यहाराचे आरोप (Allegations of misconduct) करणारी याचिका दाखल (Petition Filed) केलेली आहे. पुण्याचे प्रसिध्द अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. अजित देशपांडे, अ‍ॅड. अक्षय देसाई यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वतःची एक ध्वनिफीत व्हायरल (Audio Clip) करून कामाच्या ठिकाणी येणारे दबाव सहन होत नसल्याने आत्महत्या (Suicide) करण्याचे विचार येतात असे जाहीर केल्याने तहसीलदार देवरे (Tahsildar Jyoti Devare) महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाल्या होत्या. स्वतः केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी व सहानुभूती निर्माण करण्याच्या उद्देशाने ज्योती देवरे यांनी सदर ध्वनिफीतीचा अत्यंत चलाखपणे वापर केला असा आरोप तक्रारदार झावरे यांनी केला आहे. स्वतःच्या लोकसेवक पदाचा गैरवापर करून व्यक्तिगत हितासाठी, भ्रष्ट हेतूने अनेक पातळ्यांवर भ्रष्टाचार करणे, वाळू माफियांना परस्पर कारवाई मुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणार्‍याचे ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी मशीन व पोकलेन मशीन अशी वाहने कोणतीही तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर मुक्त करणे अशा अनेक प्रकरणांत ज्योती देवरे यांनी तब्बल 5 कोटी 94 लाख 96 हजार 72 कोटी रुपयांच्यावर घोटाळा केला आहे असा आरोप लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीतून राहुल झावरे, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके व सुहास सालके यांनी केला आहे.

ही याचिका सोमवार (दि.30) रोजी ऑलाइन पद्धतीने दाखल करण्यात आली. देवरे यांनी भ्रष्टाचार केल्याचे अनेक पुरावे याचिके सोबत दाखल करताना तक्रारदारांनी दि. 6 ऑगस्ट संयुक्त चौकशी समितीत विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे दाखल झालेल्या अहवालाचा आधार घेतला आहे.

लोकसेवेत असलेल्या व्यक्तीने विविध मार्गांनी भ्रष्टाचार करणे झटपट पैसा मिळविण्यासाठी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करणे, अपारदर्शक व्यवस्थापन असणे व जनतेच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेल्या नागरिकांसाठीच्या सनदेचे पालन न करणे हा कुप्रशासनाचा भाग आहे. काही भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे संपूर्ण प्रशासन व लोकशाहीवरील सामान्य माणसाचा विश्वास कमी होणे धोकादायक आहे असे तक्रारदारांचे वकील अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com