तहसील व पंचायत समिती इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवा - ना. काळे

तहसील व पंचायत समिती इमारतीवर 
सोलर प्लॅन्ट बसवा - ना. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणार्‍या तहसील कार्यालय व पंचायत समिती इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवा, अशी मागणी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून केली.

कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचा पंचायत समिती व तहसील कार्यालयात विविध कामानिनित्त नेहमी वर्दळ असते. या दोनही कार्यालयांना महिन्याकाठी मोठ्या स्वरुपात वीजबिल येते. दिवसेंदिवस या वीज बिलामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महसूल व ग्राम विकास विभागाचा वीज बिलापोटी मोठा आर्थिक खर्च होत आहे.

तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसविल्यास निश्चितच हा आर्थिक खर्च कमी होण्यास मदत होवून त्यातून वाचणारी रक्कम इतर सोयीसुविधांसाठी वापरली जाईल. यासाठी तहसील कार्यालय व पंचायत समितीवर इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवावे अशी मागणी ना. काळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे ना. काळे यांनी सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com