तलवारी बाळगणे पडले महागात

एलसीबीच्या कारवाईत पाच अटकेत
तलवारी बाळगणे पडले महागात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर शहरासह, एमआयडीसी, राहुरी, लोणी पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करून चार तलवारी जप्त केल्या आहेत. तलवारी बाळगणार्‍यांविरूध्द संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.

कोल्हार बु. (ता. राहाता) शिवारात तलवार घेऊन फिरणार्‍या अमजद रशिद अत्तार (वय 29 रा. कोल्हार बु.) याला पथकाने पकडले. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार राहुल सोळुंके यांच्या फिर्यादीवरून अत्तार विरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोल्हार खु. (ता. राहुरी) शिवारात तलवार घेऊन फिरणारा अजय प्रभाकर पेटारे (वय 28), संकेत दीपक कापसे (वय 25, दोघे रा. कोल्हार बु.) यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून तलवार जप्त केली आहे. अंमलदार रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नगर-औरंगाबाद रोडवरील शेंडी बायपास (ता. नगर) शिवारात सापळा लावून अनिकेत राजेंद्र घोडेकर (वय 22 रा. घोडेगाव ता. नेवासा) याला पकडले. त्याच्याकडून एक तलवार, दुचाकी व मोबाईल असा एक लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान त्याचा साथीदार जॉय त्रिभुवन (रा. नवनागापूर) हा पसार झाला आहे. त्यांच्या दोघांविरूध्द पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपोवन रोडवरील नाना चौकात तलवार घेऊन फिरणारा अक्षय बहिरू तागड (वय 25 रा. तागडनगर, तपोवन, सावेडी) याला पकडले. अंमलदार योगेश सातपुते यांच्या फिर्यादीवरून तागड विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे, पोलीस अंमलदार बबन मखरे, विजयकुमार वेठेकर, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, सचिन अडबल, राहुल सोळुंके, रणजित जाधव, संभाजी कोतकर, संदीप घोडके, संदीप पवार, रवी सोनटक्के, दिलीप शिंदे, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com