तलवार, कोयता बाळगणारे दोन युवक पोलिसांच्या ताब्यात

कोतवाली पोलिसांची जुन्या महापालिकेजवळ कारवाई
तलवार, कोयता बाळगणारे दोन युवक पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीच्या डिक्कीत तलवार (Sword) व कोयता (Koyata) बाळगणार्‍या दोन युवकांना कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) ताब्यात घेतले आहे. जुन्या महापालिकेजवळ शनिवारी (दि. 15) ही कारवाई करण्यात आली. ईशान सलीम शेख (वय 19 रा. कोटला घासगल्ली), उदय हमीद खान (वय 20 रा. जमजम हॉटेल शेजारी, पंचपीर चावडी) अशी ताब्यात घेतलेल्या युवकांची नावे आहेत.

जुन्या महानगरपालिकेजवळ (Old Municipal Corporations) दोन जण दुचाकीच्या डिक्कीत एक तलवार Sword) व एक कोयता बाळगुन गुन्हा (Crime) करण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. निरीक्षक यादव यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना कारवाईच्या सूचना दिल्या.

तलवार, कोयता बाळगणारे दोन युवक पोलिसांच्या ताब्यात
भाजप-सेनेच्या ‘सावरकर’पासून नगरमधील राष्ट्रवादी लांब

पथकाने जुन्या महापालिकेजवळ (Old Municipal Corporations) सापळा लावून दुचाकीवरून येत असलेल्या संशयीत दोघांना अडवून चौकशी केली. त्यांची झडती घेतली असता एक तलवार (Sword) व कोयता आढळून आल्याने दोघांना त्याब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) हजर केले. तलवार व कोयता कोणाकडून व कोणत्या कामासाठी बाळगून असल्याचे विचारले असता दोन्ही शस्त्र त्यांचीच असल्याचे कबुली दिली आहे. पोलीस अंमलदार अतुल काजळे यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला असून, अंमलदार सलीम शेख तपास करत आहेत.

निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, सलिम शेख, अमोल गाढे, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, सागर मिसाळ, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तलवार, कोयता बाळगणारे दोन युवक पोलिसांच्या ताब्यात
नगरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
तलवार, कोयता बाळगणारे दोन युवक पोलिसांच्या ताब्यात
भरतीसाठी सादर केले प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र बनावट
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com