तलवारी घेऊन वाढदिवस साजरा 7 जणांंवर गुन्हा; तिघांना अटक

तलवारी घेऊन वाढदिवस साजरा 7 जणांंवर गुन्हा; तिघांना अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

हातात तलवारी घेऊन संगीताच्या तालावर ठेका धरणार्‍या तिघांना वाढदिवस चांगलाच महागात पडला. पोलिसांनी या 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे.

शहरातील वॉर्ड क्र. 2 मधील काझीबाबा रोड परिसरात काल रात्री आठ वाजेच्या सुमारास काहीजण रस्ता अडवून वाढदिवस साजरा करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली असता तेथे काहीजण बेकायदेशीर जमाव जमवून हातात तलवारी घेऊन संगीताच्या तालावर आरडाओडा करत नाचत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी त्याच्याकडील 4 हजार रुपये किमतीच्या दोन तलवारी जप्त करीत त्यांना अटक केली. पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात ओम त्रिभुवन, तेजस मोरे व अनिकेत शेळके (रा. गोंधवणी) यांच्यासह 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील ओम त्रिभुवन, तेजस मोरे व अनिकेत शेळके यांना अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com