भीषण अपघात! कारला धडकून बस पलटली अन् हॉटेलमध्ये घुसली; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भीषण अपघात! कारला धडकून बस पलटली अन् हॉटेलमध्ये घुसली; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

शिरूर | तालुका प्रतनिधी

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गावर (Pune-Ahmednagar Highway) बजरंगवाडी येथे स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून रस्त्याचे विरुद्ध बाजूस येऊन लक्झरीला धडकून झालेल्या अपघातात लक्झरी पलटी होऊन थेट एका हॉटेलमध्ये घुसली. यावेळी झालेल्या अपघातात स्विफ्टकारचा चक्काचूर होत तब्बल पाच वाहनांसह हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. कार चालक विशाल बबन सासवडे या युवकाचा मृत्यू होऊन पंचवीस जण जखमी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावरून एम एच १४ एच यु २२६५ हि लक्झरी बस पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने चालली होती. अहमदनगर बाजूने आलेली एम एच १२ पि एन ६७२८ हि स्विफ्ट कार अचानकपणे दुभाजक ओलांडून रस्त्याचे विरुद्ध बाजूला येत लक्झरी बसवर आदळली. यावेळी वेगाने आलेली लक्झरी बस अचानकपणे शेजारील रॉयल पॅलेस हॉटेल समोर असलेल्या विजेच्या खांब व हॉटेलच्या फलकाला धडकून पलटी होत थेट हॉटेलमध्ये घुसली. यावेळी हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एन एच १२ एल व्ही ५११५, एन एच ०१ डी के १८०६, एन एच १२ सि के ८५६८ या तीन वाहनांना लक्झरी धडकल्याने या वाहनांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार, विक्रम साळुंके, रणजीत पठारे, नितीन अतकरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलिस नाईक कल्पेश राखोंडे, राकेश मळेकर, शिवाजी तळोले, भरत कोळी, बापू हडागळे, विकास पाटील, संतोष मार कड, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, जयदीप देवकर, अमोल नलगे, विकास मोरे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करत अपघातातील वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली. यावेळी झालेल्या अपघातात कार चालक विशाल बबन सासवडे (वय ३४ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) याचा जागीच मृत्यू झाला आहे.

बस मधील प्रवासी दिपक नरेंद्र अगरवाल (वय २८ वर्षे रा. अगरवालनगर धुळे), माणिकचंद चिमणलाल जैन (वय ६७ वर्षे रा. शंकरशेठ रोड पुणे), हरिषकुमार विजयनंद दुबे (वय ३३ वर्षे रा. दापोडी पुणे), शरयू मनिश जाखेटे (वय २२ वर्षे रा. देवपुर धुळे), प्रकाश आप्पासाहेब तुर्मतमक (वय ६४ वर्षे रा. मॉडेल कॉलनी पुणे), पुजा किसन खैरनार (वय २९ वर्षे रा. केशवनगर मुंढवा पुणे), मुकेश वेदप्रकाश सुरवसे (वय २८ वर्षे रा. म्हाडा कॉलनी औरंगाबाद), शीतल दिपक चौघुले (वय ३३ वर्षे रा. धानोरी पुणे), कुषाग्र दिपक चौघुले (वय 8 वर्षे रा. धानोरी पुणे), नागेष हरिभाऊ शिंगाडे (वय ४८ वर्षे रा. वारजे माळवाडी पुणे), अशोक पुरुषोत्तम बोरसे (वय ६५ वर्षे रा. धायरी पुणे), कल्पना अशोक बोरसे (वय ६० वर्षे रा. धानोरी पुणे), तेहरिम सज्जाद अहमद मोमिन (वय २१ वर्षे रा. मालेगाव नाशिक), फायझा फरहद शोएब अहमद मोमिन (वय २१ वर्षे रा. मालेगाव नाशिक), कृतिका मधुकर पाटील (वय २३ वर्षे रा. देवपुर धुळे), प्रणीत गोकुळ बागुल (वय ३४ वर्षे रा. आंबेगाव बुद्रुक पुणे), समर्थ मिलींद वैद्य (वय २१ वर्षे रा. साठेवाडा एफसी रोड पुणे), रिटा संजय भग (वय ४० वर्षे रा. गुरूनानक सोसायटी धुळे), सौम्या संजय भगत (वय १५ वर्षे रा. गुरूनानक सोसायटी धुळे), संदीप भरत शटकर (वय ३५ वर्षे रा. धायरी पुणे), नंदीनी राजसाहेब वाघ (वय २७ वर्षे रा. विमाननगर पुणे), मोहम्मद युनुस इत्तेखार (वय २४ वर्षे रा. मालेगाव नाशिक), सोमनाथ गोरक्ष शेंडे (वय ३२ वर्षे रा. आडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर), सोमनाथ मधुकर भोसले (वय ४६ वर्षे रा. श्रीगोंदा अहमदनगर), राजा भाईसाहेब सिंग (वय ४२ वर्षे रा. भोसरी पुणे) हे जखमी झाले आहेत. जखमींपैकी सोमनाथ गोरक्ष शेंडे, सोमनाथ मधुकर भोसले व राजा भाईसाहेब सिंग या तिघांची प्रकृती गंभीर आहे.

या घडलेल्या घटनेबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक राकेष दिलीप मळेकर (वय ३४ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी कार चालक मयत युवक विशाल बबन सासवडे (वय ३४ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार व पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहेत.

Related Stories

No stories found.