स्वतंत्र भारत पक्षाने दिली सरकारला मूठमाती

स्वतंत्र भारत पक्षाने दिली सरकारला मूठमाती

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

बलिप्रतिपदेच्या दिवशी शोषक सरकारला मूठमाती देण्याचा राज्यव्यापी कार्यक्रम स्वतंत्र भारत पक्षाने जाहीर केला होता. या कार्यक्रमास राज्यभरातून चांगला प्रतिसाद मळाला असून शेकडो ठिकाणी मूठमाती कार्यक्रम करण्यात आला.

देशात प्रस्थापित झालेली व्यवस्था कष्टकरी, व्यवसायिक, उद्योजक व प्रामाणिक नागरिकांचे शोषण करणारी आहे. या व्यवस्थेला मूठमाती देऊन सर्व जनतेच्या हिताचे बळिराज्य निर्माण करण्याचा संकल्प आज करण्यात आला. कोकण वगळता सर्व जिल्ह्यात मूठमाती कार्यक्रम पार पडला.

स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना व इतर समविचारी संघटनांचे कार्यकर्ते सहभगी झाले होते. हा कार्यक्रम कणत्याही एका पक्षाच्या विरोधात नव्हता. सर्वच पक्ष सारखे आहेत. समाजाच्या लुटीत सामील आहेत, म्हणुन स्वतंत्र भारत पक्ष या पुढे सर्व स्थांरांवरील निवडणुकांमध्ये भाग घेणार आहे. लुटारू व्यवस्था बदलून बळिराज्य निर्माण करण्यासाठी, नागरिकांनी स्वतंत्र भारत पक्षात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती स्व भा प चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com