५ नोव्हेंबर रोजी स्वतंत्र भारत पक्षाचा सरकारला मूठमाती कार्यक्रम

५ नोव्हेंबर रोजी स्वतंत्र भारत पक्षाचा सरकारला मूठमाती कार्यक्रम

श्रीगोंदा | प्रतिनिधी

बलिप्रतपदेच्या दिवशी बळीराजाला पाताळात गाडून निर्माण झालेल्या सरकार नावाच्या लुटारू व्यवस्थेला मूठमाती दऊन पुन्हा बळीराज्य सथापित करण्याची ही सुरुवात आहे. स्वतंत्र भारत पक्षाचा हा राज्यव्यापी कार्यक्रम असून शेकडो गावांमध्ये मूठमाती कार्यक्रम होणार असल्याची माहिती स्वभापचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी दिली आहे.

दिनांक ५ नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा आहे. बळीराजाला पाताळात गाडुन शेतकरी व सामान्य जनतेचे शोषण करणारी भ्रष्ट, दमनकारी, सरकार नावाची व्यवस्था तयार करण्यात आली. या व्यवस्थेचा अंत करण्याची सुरुवात या वर्षीच्या बलिप्रतिपदे पासून सुरु करत आहोत. हा कार्यक्रम कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, केंद्र किंवा राज्य सरकारच्य‍ा विरोधात नाही, कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. शोषण करणार्‍या व्यवस्थेच्या विरोधात आहे.

हे काही आंदोलन नाही, काही मागण्या ही नाहीत. सरकार जनतेची लूट करते, ठराविक व्यक्तींनाच आर्थिक लाभ मिळवून दिला जातो. निवडणुका जिंकणयासाठी शेतीमालाचे दर पाडले जातात. लायसन परमिट राजमुळे भ्रष्टाचार बोकाळतो, युवकांना रोजगाराच्या संधी निर्म‍ाण होऊ दिल्या जात नाहीत. ऐतखाउंचे लाड व श्रमिक, व्यवसायिक, उद्योजकांची पिळवणूक या सरकारी व्यवस्थेत होत आहे. स्वतंत्र भारत पक्षा मार्फत हे गावकर्‍यांना समजून सांगितले जाईल.

सर्व पक्ष सारखेच आहेत हे आता सिध्द झाले आहे. अशी लुटरू व्यवस्था उलथून टाकून सर्वांच्या हिताचे "बळीराज्य" स्थापन कण्यासाठी स्व. शरद जोशींनी स्वतंत्र भारत पक्ष निर्माण केला आहे. हा सर्वांच्या हिताचा पक्ष अनेकांना माहित व्हावा, सव.भा.प चा जाहिरनामा/विचार सर्वांपर्यंत पोहोचवला जाईल. सर्वांना न्याय, सुरक्षा मिळणे आणि सर्व जनता समृद्ध होणे हे स्व. भा. प चे लक्ष आहे. भ्रष्ट, लुटारू व जनतेला गुलाम बनविणार्‍या व्यवस्थेचा पाडाव करून खर्‍या अर्थाने जनतेच्या हिताची व्यवस्था देशात कार्यरत व्हावी हा पक्षाचा उद्देश असल्याने शेतकरी, व्यवसायिक, उद्योजक, युवक व महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडी परदेशाध्यक्षा सीमाताई नरोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com