स्वराज्य राष्ट्रीय ध्वजाचे शिर्डीत राष्ट्रवादीकडून स्वागत

स्वराज्य राष्ट्रीय ध्वजाचे शिर्डीत राष्ट्रवादीकडून स्वागत

शिर्डी (शहर प्रतिनिधी)

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भारतातील सर्वात उंच ७४ मिटरच्या स्वराज्य राष्ट्रीय ध्वजाचे जंगी स्वागत शिर्डी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र साईमंदीर प्रवेशद्वारावर करण्यात आले.

शुक्रवारी गणेश चतुर्थी दिनाचे औचित्य साधून सबका मालिक एक संदेश देणारे श्री साईबाबांच्या पवित्र भुमीत सायंकाळी सहा वाजता फटाक्यांची आतषबाजी करत शिर्डी तसेच राहाता, कोपरगांव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकत्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश गोंदकर, कोपरगाव कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहम, शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, कोपरगांव शहराध्यक्ष सुनील गंगुले, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, कोपरगांव युवक शहराध्यक्ष कुरेशी, नवाज शिर्डी शहर युवकचे उपाध्यक्ष साई कोतकर, जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते, धरम बागरेच्या कोपरगाव नगरपालिका गटनेते विरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजित शेख, सुनील शिलेदार, कोसाकाचे संचालक सचिन रोहमारे, जि. प. सदस्य प्रसाद साबळे, अनिल कदम, रमेश गवळी, शिर्डी युवकचे शहराध्यक्ष विशाल भडांगे, अलकाताई कोते, शोभाताई वर्पे आदी उपस्थित होते.

३७ दिवसांच्या या प्रवासात स्वराज्य ध्वज ६ राज्यामधून १२ हजार किलोमीटर प्रवास करणार आहे. धार्मिक, आध्यात्मिक स्थळे स्मारके अशा उर्जा केंद्र असलेल्या ७४ ठिकाणी प्रातिनिधीक स्वरूपात पुजन होणार असल्याची माहिती देण्यात आली. देशातील प्रमुख तिर्थक्षेत्रावर देखील अशाच प्रकारे पूजाअर्चा करून १५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर कर्जत जामखेडमधील खर्डा येथील किल्ल्यावर उभारण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर यांनी दिली.

यावेळी कोपरगाव मतदार संघातील आ. आशुतोष काळे यांच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. येथून सदरचा ध्वज यात्रा त्र्यंबकेश्वर येथे मुक्कामी जाणार असल्याचे समजले. यावेळी सदरचे ध्वजाची कल्पना तरुणांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास चंद्रे यांनी व्यक्त करून आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com