महिलांची खिल्ली उडविणे हाच नगराध्यक्षांचा पिंड - निखाडे

महिलांची खिल्ली उडविणे हाच नगराध्यक्षांचा पिंड - निखाडे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

एका कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष विजयराव वहाडणे (Vijay Vahadne) यांनी कोपरगांव (Kopargav) मतदार संघाच्या प्रथम माजी महिला आमदार व माजी महिला मुख्याधिकारी यांच्या बद्दल बोलताना या महिलाबद्दल तिरस्कराची भाषा वापरून खिल्ली उडविली होती या गोष्टीवरुन भाजपाच्या महिला शहराध्यक्षांनी वहाडणे यांना या गोष्टीचा जाब विचारुन त्यांचा तीव्र शब्दात निषेध (Protest) व्यक्त केला होता.

वरील गोष्ट घडल्यानंतर परत एकदा माजी महिला आमदारांबद्दल गरळ ओकली त्यांनी कोणताही निधी कोपरगाव नगपरिषदेला (Kopargav Municipal Council) मिळवून दिला नाही असे धडधडीत जनतेला खोटे सांगितले यावरुन वहाडणे (Vahadane) यांची महिलांविषयीची (Women) व्देष भावना दिसून येते. व्यक्तिगत राजकीय फायद्यासाठी खोटे बोलणे ही नगराध्यक्षाची प्रवृत्ती आहे, अशी टीका उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे (swapnil Nikhade) यांनी केली.

उपनगराध्यक्ष निखाडे म्हणाले, कोल्हे परिवाराने (Kolhe Family) महिलांसाठी काय केले असा प्रश्न आपण विचारला संजीवनी उद्योग समुहात व संजीवनी शैक्षणीत संकुलात आजही शेकडो महिला शिक्षीका (Women Teacher) महिला भगिनी कार्यरत आहेत. संजीवनी महिला बचत गटाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा रोजगार माता भगिनींना मिळवून देऊन करोना काळातही काम सुरू आहे. संजीवनी महिला गारमेंट क्लस्टर मार्फत शेकडो महिला स्वावलंबी होत आहेत हे उघड्या डोळ्यांनी जाऊन बघा.

महिला भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी (Women Empowerment) 22 कोटी पेक्षा अधिक रक्कम उभारली. कॉल सेंटरच्या (Call Center) माध्यमातून शेकडो युवतींना व महिला भगिनींना रोजगार उपलब्ध झाला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी सौ.कोल्हे ताईंच्या प्रयत्नांमुळे कोपरगांव नगरपरिषदाला मिळाला आहे. हे नाकारण्याचा तुमचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे रडीचा डाव आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com