शिर्डी नगरपंचायतला कचरामुक्त शहर व थ्री स्टार मानांकन : पुरस्काराची हँट्रीक

राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान
शिर्डी नगरपंचायतला कचरामुक्त शहर व थ्री स्टार मानांकन : पुरस्काराची हँट्रीक

शिर्डी | शहर प्रतिनिधी

स्वच्छ शहरांमध्ये लागोपाठ देशपातळीवर व राज्यपातळीवर दोनवेळा पुरस्कार पटकावणा-या शिर्डी नगरपंचायतीस नुकताच केंद्रीय शहरी कार्य मंत्रालय व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियानांतर्गत कचरामुक्त शहर आणि थ्री स्टार मानांकन मिळाले असून शिर्डी नगरपंचायतने पुरस्काराची हँट्रीक मारली आहे.

दरम्यान शिर्डी नगरपंचायतीस केंद्रीय शहरी कार्य मंत्रालय व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियानांतर्गत कचरामुक्त शहर आणि थ्री स्टार मानांकन मिळाल्याने हा पुरस्कार २० नोव्हेंबर २०२१ रोजी नवी दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

शिर्डी नगरपंचायतीस पुरस्काराची घोषणा होताच शिर्डी ग्रामस्थांनी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते व नगरसेवक यांच्यासह कर्मचाऱ्यांवर शुभेच्छांंचा वर्षाव करण्यात आला आहे.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सांगितले की गेल्या तीन वर्षातील हा तिसरा पुरस्कार असून या वर्षातील एका वर्षांमधील दुसरा पुरस्कार आहे. हि खरी अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार सर्वांच्या सहकार्याने प्राप्त झाले असून यापुढेही नगरपंचायत आणि सर्वांच्या सहकार्याने २०२२ मधील स्वच्छ सर्वेक्षण मध्ये राष्ट्रीय स्तरावरचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवू असा संकल्प आम्ही केला असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान आंतरराष्ट्रीय शहराबरोबरच शिर्डी शहराची ओळख स्वच्छ शहर म्हणून राष्ट्रीय स्तरावर नावारूपाला आली आहे. शहर पुर्णपणे कचरामुक्त झाले आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा, स्ट्रिटलाईट आदीसह मुलभूत गरजा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. याबरोबरच शहर सुशोभीकरण करण्यात आले असून पर्यावरण तसेच पर्यटन यावर अधिक भर देण्यात आला आहे.शहरात आतापर्यंत पंधरा हजार वृक्षांची लागवड करून यशस्वीपणे मोहीम राबविण्यात आली आहे.

माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगरपंचायतीस आतापर्यंत मिळालेल्या स्वच्छ शहर तसेच माझी वसुंधरा या तीनही पुरस्कारामध्ये शहरातील महिला भगीनी यांचा मोठा सहभाग असून हा सन्मान त्यांचा आहे. शिर्डी शहराची ओळख स्वच्छ शहर म्हणून देशात पोहचली असून यापुढेही अशीच पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहाणार आहे.

शिवाजी गोंदकर (नगराध्यक्ष शिर्डी नगरपंचायत शिर्डी)

शिर्डी नगरपंचायतला स्वच्छतेसाठी साईसंस्थानकडून मिळणारा निधी दोन वर्षापासून मिळाला नाही. तरीसुद्धा शिर्डी नगरपंचायतचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेवर तसेच कचरामुक्तीसाठी विशेष लक्ष केंद्रित केले. त्यासाठी नागरीकांची यशस्वी साथ मिळाली त्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला असून याचे सर्व श्रेय नागरिक, पदाधिकारी व कर्मचारी यांनाच आहे. यापुढे अधिक गतिमान आणी प्रभावीपणे काम करून स्वच्छतेच्या बाबतीत साईबाबांच्या शिर्डी शहरास राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांक प्राप्त करून देण्याचा आमचा संकल्प आहे.

काकासाहेब डोईफोडे (मुख्याधिकारी शिर्डी नगरपंचायत)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com