अहमदनगर (प्रतिनिधी) -

स्वच्छ भारत अभियानांतर्गत फाईव्ह स्टारचे मानांकन मिळावे यासाठी महापालिका सरसावली असून भल्या सकाळीच

अधिकारी रस्त्यावर उतरून झाडलोट करत आहेत. उपायुक्त यशवंत डांगे हेही सकाळीच स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवित आहेत.

वाडिया पार्क, माळीवाडा भागात रस्त्यावरील मातीचे ढिगारे, दगडगोटे, गवत मोहिमेतंर्गत काढण्यात आले. आहे. शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावेे. स्वच्छता मोहिम ही एक लोक चळवळ व्हावी यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन उपायुक्त यशवंत डांगे यांनी केले.