संशयितरित्या फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

तोफखाना पोलिसांची कल्याण रोड परिसरात कारवाई
संशयितरित्या फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कल्याण रोड परिसरात रात्रीच्यावेळी संशयितरित्या फिरणार्‍या तरुणाला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोपट विष्णू गायकवाड (वय 32 रा. कडा ता. आष्टी, जि. बीड) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरूध्द मुंबई पोलीस कायदा कलम 122 (क) नुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार राहुल म्हस्के यांनी फिर्याद दिली आहे.

शनिवारी रात्री पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या आदेशानुसार अंमलदार राहुल म्हस्के यांच्यासह होमगार्ड सोहेल शेख हे नाईक सेक्टर चार तोफखाना हद्दीत रात्र गस्त घालत होते. रात्री साडेदहा वाजता ते कल्याण रोड परिसरात गस्त घालत असताना येथील वंदेमातरम पार्क जवळ एक तरुण भिंतीच्या आडोशाला अंधाराचा फायदा घेत लपत असताना दिसला. अंमलदार म्हस्के व होमगार्ड शेख यांना शंका आल्याने त्यांनी त्या तरुणाकडेे चौकशी केली असता तो पळून जाऊ लागला.

म्हस्के व शेख यांनी त्या तरुणाचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता रात्रीच्यावेळी तो कशासाठी फिरत होता याबाबत त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी त्या तरुणाला ताब्यात घेत तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com