जगने की रात...अन् ‘तो’ सापडला

स्कॉर्पिओ घेतली ताब्यात || कोतवालीत गुन्हा
जगने की रात...अन् ‘तो’ सापडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रात्रीच्या वेळी स्कॉर्पिओ (Scorpio) घेऊन संशयितरित्या फिरणार्‍या युवकाला अहमदनगर शहरातील सबजेल चौकात (Subjail Chowk) नागरिकांनी पकडले. शिव अण्णासाहेब सोनवणे (वय 19 रा. रंगभवन, सर्जेपुरा) असे पकडलेल्या युवकाचे (Youth) नाव आहे. कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) त्याच्याविरूध्द भादंवि कलम 124 सह मोटार वाहन कायदा कलम 3 (1), 181, 184 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Crime) केला आहे.

यासंदर्भात पोलीस अंमलदार श्रीकांत खताडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (Police) त्याची स्कॉर्पिओ (Scorpio) ताब्यात घेतली आहे. गुरूवारी रात्री ‘जगने की रात’ साठी कोतवाली पोलीस (Kotwali Police) बंदोबस्तावर होते. रात्री 12 वाजेच्या सुमारास कापडबाजार (Kapad Bazar) येथे स्कॉर्पिओ (एमएच 16 एबी 0519) सर्जेपुराकडून भिंगारवाला चौकाकडे भरधाव वेगात येत असताना त्याला पोलिसांनी (Police) थांबवले. तो न थांबल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पुढे त्याला सबजेल चौकात नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Related Stories

No stories found.