१६ वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू; जिल्ह्यात खळबळ

घातपाताची शक्यता
१६ वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू; जिल्ह्यात खळबळ

पारनेर l तालुका प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील जवळे येथे बरशीले वस्तीवर १६ वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृतदेह तिच्या घरी आढळून आला आहे. आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही वर्षापासून या मुलीचे आई वडील जवळे येथे वास्तव्यास आहेत. मोलमजुरी करून ते आपला चरितार्थ चालवितात. नेहमीप्रमाणे मुलीचे आई वडील सकाळी मोलमजुरीसाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलीचा भाऊ क्लास साठी निघून गेला. त्यानंतर या मुलीचा घातपात झाला असावा अशी शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या मृतदेहाजवळ एक कापडी बोळा आढळून आल्याने सांगण्यात आले.दुपारी मुलीचा भाऊ घरी आल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने बहिणीला हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्याने आरडा ओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक धावून आले. मुलीस खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

अत्याचार करून खून ?

मुलीच्या मृतदेहाजवळ एक चाकु तसेच टॉवेलच्या तुकड्याचा बोळा आढळून आल्याची माहिती पुढे आली असून चाकुचा धाक दाखवून तोंडात बोळा कोंबून मुलीवर अत्याचार करण्यात आला, त्यातच तिचा मृत्यू झाला असावा असेही सांगण्यात आले. मात्र त्यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुलीवर अत्याचार झाले कि करण्याचा प्रयत्न झाला आहे हे आता पी एम रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल. ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com