निलंबित पोलीस उपनिरीक्षकांचा सन्मान

उत्कृष्ठ कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांकडून सन्मानपत्र
निलंबित पोलीस उपनिरीक्षकांचा सन्मान

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित (Suspended) केलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील (Sangamner City Police Station) पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी (Sub-Inspector of Police Rohidas Mali) यांना जिल्हा पोलीस प्रमुख यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानपत्र (Certificate of Excellence) पाठविले आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन त्यांनी माळी यांचा सन्मान केला. मग त्यांना निलंबितच का केले ? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी (Sub-Inspector of Police Rohidas Mali) यांचेवर काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रमुखांनी (SP Suspended Action) निलंबनाची कारवाई केली होती. कर्तव्यात कसूर करणे, गुन्ह्यांचा तपास न लावणे, रजेच्या काळात पोलीस ठाण्यात चुकीच्या नोंदी करणे असा ठपका ठेवत माळी यांना निलंबित करण्यात आले होते. माळी यांचे निलंबन चुकीचे असल्याची भावना पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांसह अनेक नागरिकांमधून व्यक्त होत होती. निलंबनाची कारवाई मागे घेऊन माळी यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी एका सामाजिक संघटनेने पोलीस उपविभागीय अधिकार्‍यांकडे केली होती. संगमनेरच्या स्थानिक अधिकार्‍यांनी उपनिरीक्षक माळी यांना हेतुपुरस्सर निलंबित केल्याची चर्चाही त्यावेळी झाली होती. याबाबत दैनिक सार्वमतमध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते.

माळी यांनी आपल्या कारकीर्दीत विविध गुन्ह्यांचे तपास लावले होते. मुस्कान मोहीमच्या माध्यमातून अनेक बेपत्ता युवती, महिला व पुरुषांचाही त्यांनी शोध लावला होता. असे असतानाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई ताजी असतानाच उपनिरीक्षक माळी यांना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी अति उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशंसापत्र दिले आहे. ज्या पोलीस अधिक्षकांनी माळी यांना निलंबित केले त्याच पोलीस अधिक्षकांनी त्यांना प्रत्यक्षात पत्रही दिले. मग माळी यांना कुणामुळे निलंबित व्हावे लागले याची आता उलटसुलट चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com