निलंबित पोलीस निरीक्षकाला अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक

तोफखाना पोलिसांची कारवाई
निलंबित पोलीस निरीक्षकाला अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक

अहमदनगर|Ahmedagar

तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ याला नाशिक येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वाघ याला अटक करून आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली. निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

कोतवाली पोलीस ठाण्याचा तात्कालिक पोलीस निरीक्षक विकास वाघ वादग्रस्त ठरल्यानंतर त्याची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली होती. त्याच्या विरोधात एका महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर वाघ विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान सदर महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दुसरा अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पसार असेला वाघ याला अटक करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com