PFI संघटनेशी संबंध असलेल्या संगमनेरातील मौलानावर कारवाई

PFI संघटनेशी संबंध असलेल्या संगमनेरातील मौलानावर कारवाई

संगमनेर | शहर प्रतिनिधी

सध्या देशभर चर्चेत असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या इस्लामी संघटनेचे जाळे संगमनेरपर्यंत पोहोचले असल्याचे सिद्ध झाले आहे.

या संघटनेची संबंध असलेल्या एका मुस्लिम धर्मगुरूला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. मोहम्मद खलील दिलावर शेख असे या मौलानाचे नाव असून तो पीएफआयचा संगमनेर शहराध्यक्ष आहे.

पीएफआय या संघटनेसोबत संपर्क असलेल्यावर गुरुवारी राष्ट्रीय तपास संस्थेसह सक्तवसुली संचालनालयाने देशभरातील ११ राज्यात छापेमारी करीत १०६ जणांना अटक केली होती.या कारवाईत अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश झाला असून राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या सूचनेवरुन संगमनेर शहर पोलिसांनी काल पहाटे संगमनेर खुर्द मधील एका मौलाना ला ताब्यात घेतले आहे. या मौलानाच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा संगमनेर शहराध्यक्ष मौलाना मोहम्मद खलील दिलावर शेख (वय 38, रा.संगमनेर खुर्द) याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी त्याची चौकशी केली. पीएफआयचे धागेदोरे संगमनेर शहरापर्यंत पोहोचल्याने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com