PFI संघटनेशी संबंधित दोघे पोलिसांच्या ताब्यात

जिल्ह्यात कुठे झाली कारवाई?
PFI संघटनेशी संबंधित दोघे पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर | प्रतिनिधी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या इस्लामी संघटनेत कार्यरत असलेल्या नगर जिल्ह्यातील दोघांना आज (मंगळवारी) पहाटे ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. नगर शहर आणि संगमनेरमध्ये ही कारवाई केली आहे.

नगर शहरातील कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, भिंगार कॅम्प व तोफखाना पोलिसांनी केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मागील आठवड्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्लीसह ११ राज्यांमध्ये धाडसत्र सुरू केले आहे. यादरम्यान, तपास यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालये व सदस्यांवर धाडी टाकल्या. विविध राज्यातून १०६ लोकांना अटक केली आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात सर्वाधिक कार्यकत्यांना अटक झाली आहे.

नगर शहरातून संघटनेशी निगडित असलेल्या जुबेर आणि संगमनेरमधून सदस्य असलेल्या मौलानाला ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

पीएफआयवर देशात हिंसाचार भडकवणे, दहशतवादी हल्ले करणे, दंगे भडकवणे आणि टेरर फंडिंगसारखे गंभीर आरोप आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com