सुरेगावात विवाहितेवर लैंगिक अत्याचार

सुरेगावात विवाहितेवर लैंगिक अत्याचार

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील सुरेगाव परिसरातील महिला गोदावरी नदीकाठी धुणे धुण्यासाठी गेली असता त्याच गावातील आरोपीने तिला जवळच्या काटवनात हात धरून घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेगाव परिसरातील विवाहित महिला दि .14 मे रोजी सकाळी धुणे धुण्यासाठी गोदावरी नदीकाठी गेली असता त्याच गावातील आरोपी तिच्या पाठलागावर गेला होता. त्याने आजूबाजूला कोणी नाही ही संधी साधत तिचा हात धरून बळजबरीने काटवनात ओढत नेले व तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. तिने आरडाओरडा केला असता त्या ठिकाणी कोणीही नसल्याने त्याचा उपयोग झाला नाही.

याबाबत संबंधित महिला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली होती. मात्र तिचा चुलत सासरा यांनी बेइज्जती होईल या भीतीने दूरध्वनीवरून तक्रार देऊ नका घरी जा, असे सांगितल्याने ही तक्रार झाली नव्हती. मात्र त्यांनी तक्रारी अर्ज दिला होता त्यावरून पोलिसानी चौकशी कामी बोलावल्यावर हा प्रकार उघड झाला आहे.

दरम्यान या घटनेची गंभीर दाखल शिर्डी पोलीस विभागीय अधिकारी संजय सातव यांनी घेतली असून घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी फिर्यादी महिलेने काल कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विजय चंदू जिरे विरुद्ध भा.दं.वि.कलम 376, 354, 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.