
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
तालुक्यातील सुरेगाव (Suregav) येथील शेतकरी प्रशांत शिवाजीराव वाबळे (वय 42) यांचा नऊ एकरावरील ऊस (Sugar) महावितरणच्या तारांचे स्पार्किंग (Sparking of Wires) होऊन जळून खाक झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात (Kopargav Taluka Police Station) नोंद केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरण कंपनीच्या तारांच्या स्पर्किंगमुळे तालुक्यातील सुरेगाव येथील शेतकरी प्रशांत वाबळे यांच्या शेतातील नऊ एकर ऊस (Sugar) व त्यांच्या नजीकचे शेतकरी संजय सुंदरराव कदम यांचा तीन एकर, योगेश प्रतापराव कदम, राजेंद्र नारायण वाबळे यांचाही ऊस जाळून खाक (Sugarcane Fire) झाला आहे.
दरम्यान या प्रकरणी प्रशांत वाबळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात (Kopargav Taluka Police Station) धाव घेऊन याप्रकरणी मोठ्या आकस्मित जळिताची नोंद दाखल केली आहे. त्यांनी त्यात महावितरण कंपनीच्या विद्युत वाहक तारांचे स्पर्किंग होऊन सदर जळीत झाले असल्याची नोंद केली आहे. याबाबत आता महावितरण कंपनी नेमकी काय भूमिका घेते याकडे शेतकर्यांचे (Farmer) लक्ष लागून आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.