रेमडेसिवीरसाठी श्रीरामपूरकरांवर आत्मक्लेशाची वेळ

रेमडेसिवीरसाठी श्रीरामपूरकरांवर आत्मक्लेशाची वेळ

प्रशासनाला दिला दोन दिवसांचा अल्टीमेटम

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा त्वरित शासनाने श्रीरामपूरवासियांना करावा इंजेक्शनअभावी रुग्णांचे व रुग्णांच्या कुटुंबाचे हाल त्यांची वणवण भटकंती थांबवावी.

अन्यथा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले जाईल, असा इशारा जय माता दी मित्र मंडळ, जिजामाता तरुणमित्र मंडळ,कालिका माता मित्र मंडळ यांच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, रविंद्र गुलाटी, हिंदसेवा मंडळाचे मानदसचिव संजय जोशी, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, नगरसेवक राजेश अलघ यांनी दिला आहे.

रेमेडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा त्वरित शासनाने श्रीरामपूरवासियांना करावा. इंजेक्शनअभावी रुग्णांचे व रुग्णांच्या कुटुंबाचे हाल होत असून कुटुंबियांची वणवण भटकंती होत आहे. शासन म्हणतोय कोव्हिड सेंटरमध्येच उपलब्ध होतील, तर कोव्हिड सेंटर म्हणतात आधी इंजेक्शन घेऊन या मग मेडिकल स्टोअर्समध्ये परवानगी नसल्याने तेथे ही इंजेक्शन मागण्यास मनाईकेली आहे.

प्रांताधिकारी तहसीलदार यांनी शासनाकडे श्रीरामपुरात कमी प्रमाणात होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची त्वरित जास्तीची मागणी करून उपलब्धता करून द्यावी. जिल्ह्यात सर्वात कमी प्रमाणात श्रीरामपूरकरांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होतो.श्रीरामपूरचा कोणीही राजकीय वाली राहिलेला नाही. त्यामुळे आता समाजकारण करणार्‍या संघटनांनी एकत्रित होऊन लढा उभारावा.

शासनाने रुग्णांचा आत्मिक आवाज ऐकावी 500 रेमीडीसीवर इंजेक्शन त्वरित (दोन दिवसांत) उपलब्ध करून द्यावेत. अन्यथा प्रांत कार्यालय तहसील कार्यालय येथे सर्व रुग्णांच्या नातेवाईक येऊन इंजेक्शनची मागणीसाठी आत्मक्लेष करतील. शासनाला जे काही गुन्हे दाखल करून कारवाई करायची असेल त्यांनी आमच्यावर करावी. श्रीरामपूरकराच्या न्यायासाठी आमची कुठल्याही स्तरावर जाण्याची तयारी असल्याचे सांगितले.

श्रीरामपूरकरांसाठी त्या इंजेक्शनची जी काही रक्कम होईल ती आम्ही सर्वजण देण्यास तयार आहोत. फक्त आम्हाला आता श्रीरामपूरकर मरताना बघवत नाही. तेव्हा ते इंजेक्शन प्रांत कार्यालयात जरी भेटले तरी चालेल. आता आपल्यासाठी आपल्यालाच भांडावं लागेल, असे माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी व हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com