सुप्याला विसापूर पाणी योजनेची प्रतीक्षा

काम कासवगतीने, दर्जा ढासळला
सुप्याला विसापूर पाणी योजनेची प्रतीक्षा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील सुपा गावाला विसापूर पाणी योजनेसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. 15 कोटी रुपयांच्या या पाणी योजनेचे काम कासव गतीने चालू आसल्याने कामाचा दर्जा ढासळत असून बजेटही वाढण्याची चिन्हे आहेत. सर्व काम होईल का? असा प्रश्न उभा राहत आहे.

औद्योगिक नगरी म्हणून उदयास येत आसलेल्या या मार्गावरील चौकावरील गाव व कामगार वर्गामुळे सुपा गावचा फुगवटा वाढू लागला वाढत्या शहरीकरणाची तहान भागविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून चौदा कोटी 31 लाख रुपये किमतीची सुपा विसापूर पाणी योजना मंजूर झाली यात विसापूर तलाव ते सुपा 24 कि मी पाईपलाईन मुख्य साठवण तलावासह सात छोट्या मोठ्या टाक्या व घर तेथे पाणी असा आराखडा झाला.

जवळजवळ 70 टक्के काम झाले असून गेल्या दोन तीन वर्षांपासून खुप संथ गतीने काम चालू आहे. अजून दोन टाक्यांसह गावातील काही अंतर्गत पाईपलाईन काम बाकी आहे . कामाची चाल पाहता सन 2022 मध्ये तरी विसापूर पाणी योजनेचे पाणी मिळेल का? अशी शंका नागरीक व्यक्त करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com