सुपा येथे हर घर तिरंगा अभियानास सुरूवात

ग्रामसभेत विविध ठरावांवर चर्चा होऊन ते मंजूर
सुपा येथे हर घर तिरंगा अभियानास सुरूवात

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपचायंत आसलेल्या सुपा ग्रामपंचायतीती ग्रामसभा शनिवारी शांततेत पार पडली. या विविध विषयावर चर्चा होऊन हर घर तिरंगा झेंडा आभियानाची सुरवात झाली. तसेच यावेळी विविध ठराव मंजूर झालेे.

सरपंच मनिषा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सुपा ग्रांमपचायतीच्या सभागृहात ग्रामसभा झाली. यात काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. यात मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, हर घार तिंरगा झेंडा आभियान राबवने, ग्रामपंचायत कर वसुली, जलजीवन मिशनअंतर्गत हर घर जल गाव घोषीत करणे, कोविड लस्सीकेरण केंद्रावर मोफत प्रतिबंधात्मक बुस्टर डोस घेण्याबाबत जन जागृती करणे हे ठराव मंजुर करण्यात आले तसेच काही ऐनवेळच्या विषयावर चर्चा झाली.

यावेळी सरपंच व उपसरपंच ग्रांमविकास अधिकारी यांनी विविध योजनाची माहिती दिली. सुपा आरोग्य उपकेंद्राच्या प्रमुख डॉ.विद्या बारवकर व आरोग्य सेविका अश्विनि कर्डीले यांनी लस्सीकरणा विषयी माहिती दिली. स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाच्या निमित्ताने हर घर पर तिंरगा झेंडा अभियान राबवन्याचे शासनाचे आदेश असल्याने सुपा ग्रामपंचायतही संपूर्ण सुपा शहरात हर घर तिंरगा झेंडा अभियान राबणार असून त्याच्या प्ररंभ करण्यात आला.

यावेळी उपसरपंच दत्तात्रय पवार, सागर मैड, ग्रामपंचयत सदस्य विजय पवार, विलास पवार, अनिता पवार, शरद पवार, सुरेश नेटके, कानिफ पोपळघट, बाळासाहेब औचिते, सचिन पवार, पप्पू पवार, इम्रान शेख, सचिन काळे, प्रताप शिंदे, ग्रांमविकास अधिकारी दुधाडे, योगेश रोकडे सोसायटी चेरमन व्हाईसचेअरमन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com